Home महाराष्ट्र भोजगाव व गोपत पिंपळगावचे भाजपा कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

भोजगाव व गोपत पिंपळगावचे भाजपा कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

83

🔸अमरसिंह पंडित यांनी केले स्वागत…

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.24डिसेंबर):- ग्रामपंचायत निवडणुकीतील भरघोस यशाच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत.मौजे भोजगाव आणि गोपत पिंपळगाव येथील भाजपा कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

गुरुवार दिनांक दि.२२ डिसेंबर रोजी भोजगाव येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते कृष्णा पाटील संत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपाला सोडचिट्ठी देत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले.यावेळी गणेश फरताडे,शैलेश संत,विलास काळे,सर्जेराव काळे,विष्णू मस्के, नितीन संत,आपासाहेब मस्के, डिगांबर आडे,गोविंद दातार,गणेश शिंदे,मधुकर शिंदे,किसन सुपेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

मौजे गोपत पिंपळगाव येथील उद्धवराव तौर,गणेश तौर,संभाजी तौर यांनीही यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.यावेळी शंकरबप्पा तौर, निवृत्ती तौर,शिवाजी तौर,उत्तरेश्वर तौर,रामभाऊ तौर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here