Home महाराष्ट्र शेंदूरजना घाट येथे संपन्न होणार २२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !

शेंदूरजना घाट येथे संपन्न होणार २२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !

169

🔸माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार नितीन देशमुख, माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांची उपस्थिती !

🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे शेघाट येथील पाणीप्रश्न निकाली !

✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरुड(दि.23डिसेंबर):-शेंदूरजना घाट येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाणी पुरवठा योजनेच्या कामाकरीता २० कोटी ६२ लक्ष ७१ हजार रुपये, माजी आमदार स्व. श्री. महादेवरावजी आंडे स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्र निर्माण करने १ कोटी रूपये, यासह विविध विकासकामांचे भुमीपूजन माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी कृषी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख, नितीनजी देशमुख शिवसेना आमदार बाळापुर मतदारसंघ अकोला, आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत हा सोहळा शनिवार (दि.२४) डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शेंदुरजना घाट येथे संपन्न होणार आहे.

शेंदूरजना घाट येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे विविध बैठक घेऊन यशस्वी पाठपुरावा करून सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शेंदुरजना घाट येथे शहराच्या पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी 22 ऑक्टोंबर 2020 रोजी पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे शेंदुरजना घाट येथील पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय प्रशासकीय मान्यता प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्यामुळे २ डिसेंबर २०२० रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन शेंदूरजना घाट येथील पानी पुरवठा योजणेकरीता तब्बल २० कोटी ६२ लक्ष ७१ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून माजी आमदार स्व. श्री. महादेवरावजी आंडे स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्र निर्माण करने १ कोटी रूपये मंजूर करून यासह विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटक माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार नितीन देशमुख, माजी कृषी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख, आमदार देवेंद्र भुयार, माझी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशपंत वडस्कर, नीळकंठ वाऱ्होकार, मोहनराव गणोरकर, अंकुशभाऊ मोघे, जयाताई श्रीराव, वंदनाताई बेलसरे, अजयभाऊ सरोदे, राजश्री डोइफोडे, तेजस बेलसरे, जगदीश काळे, संजयभाऊ हरे, देवानंद जोगेकर, लुकेश वंजारी यांच्यासह आदी मंडळी उपस्थित राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here