Home चंद्रपूर रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन उभारू-उमा तोकलवर (आप महिला अध्यक्ष घुग्घुस)

रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन उभारू-उमा तोकलवर (आप महिला अध्यक्ष घुग्घुस)

61

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.23डिसेंबर):-शिवनगर वार्ड क्रमांक पाच येथे जाणार्‍या मुख्य मार्गाची मागील कित्येक वर्षापासून दूरव्यवस्था झालेली आहे ज्यामुळे तेथील नागरिकांना त्या मार्गाने ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.ही बाब लक्षात घेता मागील एक वर्षापासून आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा वारंवार निवेदन करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे.शिवनगर मध्ये जाणारा मार्ग येथील नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

त्यामुळे येत्या 15 डिसेंबर पर्यंत या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही तर आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा स्थानिय वेकोली प्रबंधक तसेच नगरपरिषद घुग्घुस निषेधार्थ दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पासून उपोषण करण्यात येईल यास जबाबदारी संबंधित विभाग राहतील.

निवेदन देताना अध्यक्ष अमित बोरकर यांच्यासह उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here