Home महाराष्ट्र श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषित पुसेगाव रथोत्सव संपन्न

श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषित पुसेगाव रथोत्सव संपन्न

115

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

पुसेगाव(दि.23डिसेंबर):- तालुका खटाव जिल्हा सातारा येथील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथ पूजन महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषाने अवघे पुसेगाव नगरी दुमदुमली.

याप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री संदिपान भूमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब मुकुटराव जाधव, विश्वस्त गौरव रायसिंग जाधव, संतोष गुलाबराव वाघ, सचिन हिंदुराव देशमुख ,डॉ. सुरेश सर्जेराव ,जाधव रणधीर सुभाष जाधव, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज पहाटे सकाळी संजीवनी समाधीला अभिषेक घालून श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा रथामध्ये मध्ये ठेवण्यात आली. रथ पूजनानंतर अकरा वाजता नगर प्रदक्षिणेसाठी रथ मार्गावर निघाला. अग्रस्थानी मानाचा झेंडा व मानाचा हत्ती ,हलगी ,ढोल ताशा लेझीम, बँड पथके, यांच्यासह मिरवणूक निघाली. यात्रेमध्ये विविध प्रकारच्या खेळण्याची दुकाने मिळवा मिठाई जिलेबी विविध प्रकारचे पाळणे यामुळे यात्रा फुलून गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here