Home महाराष्ट्र बोथा येथील जातीवादी आरोपीला तात्काळ अटक करा -दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भिम...

बोथा येथील जातीवादी आरोपीला तात्काळ अटक करा -दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भिम टायगर सेना)

102

🔹अन्यथा भिम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:;9823995466

महागाव (दि. 22 डिसेंबर):-जिल्ह्यातील मौजे बोथा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे काही जातिवाद्या कडून व जातीय द्वेष भावनेतून भीमराव देवराव खंडागळे वय अं. 33 वर्ष (ग्रामरोजगार सेवक) व सरपंच रमाबाई भिमराव खंडागळे यांच्या कुटुंबावर प्राणघाती करणारे आरोपी 1) गजानन नारायण कोरडे वय अं. 40 वर्ष, 2) विलास विठ्ठल कवडे व अंदाजे 32 वर्ष, 3) सूर्यभान बळीराम मोहकर वय अंदाजे 55 वर्ष, 4) अशोक सखाराम मोरे व अंदाजे 40 वर्ष, 5) विठ्ठल यादव गायकवाड अंदाजे 45 वर्ष, 6) संतोष कोंडबा मोरे वय अं.40 वर्ष, 7) मारुती मोती सिंग जाटवा वय अं. 40 वर्ष सर्व राहणार बोथा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या सर्वांना तात्काळ अटक करण्यात यावी.

अशी मागणी यावेळी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी भीमराव देवराव खंडागळे रा. बोथा (सा) यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन व मोलाचे मार्गदर्शन करून खंडागळे कुटुंबाच्या आम्ही सदैव आपल्या सोबतच आहों अशी ग्वाही दिली.

गुंडवृत्ती प्रवृत्तीचे जातीवादी आरोपींना तात्काळ अटक न केल्यास भीम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी व इतर संघटना मिळून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दादासाहेब शेळके यांनी दिला.

यावेळी खंडागळे पीडित परिवाराला वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोषभाऊ जोगदंडे, ॲड. पंजाबराव नवसागरे, सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना), कैलास कदम (तालुका अध्यक्ष) पप्पूभाऊ कावळे, इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here