Home महाराष्ट्र बेरोजगार तरुणांनी आत्महत्या करणे हा मूर्खपणा – काष्टशिल्प कारागीर पंजाबराव पुंड

बेरोजगार तरुणांनी आत्महत्या करणे हा मूर्खपणा – काष्टशिल्प कारागीर पंजाबराव पुंड

148

✒️बळवंत मनकर(अमरावती प्रतिनिधी)

अमरावती(दि.23डिसेंबर):-चांदुर रेल्वे येथील 80 व्या वर्षी स्वतःची उपजीविका स्वतःच्या मेहनतीच्या बळावर करणारे पंजाबराव पुंड हे समाजाकरीता प्रेरणास्थान आहे. त्यांची खास मुलाखत ब्लू टायगर ऑफिस जनता दरबार येथे भूषण सरदार यांनी घेतली. पंजाबराव पुंड हे 60 रू.पासून ते 40 हजार रु. पर्यंत च्या वस्तू बनवतात उदा. की-अँगर , महापुरुषांची लाकडी मूर्ती इत्यादी.

जागोजागी जाऊन घरपोच ते वस्तू विकतात त्यांनी हे काम 68 व्या वर्षी सुरू केले आता ते 80 चे आहेत. रोज 1200 ते 2000 रू ते कमवतात. हा व्यवसाय करताना त्यांना आनंद होतो असे त्यांचे मत आहे. कोणत्याही तरुणाने नोकरी नसेल तर काम धंदा करावा कपडे विकावे, भाजीपाला सुरू करावा किंवा मूर्तिकार बनावं पण आत्महत्या करणे हा मूर्खपणा आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचा हा 80 व्या वर्षी सुरू असणारा संघर्ष आजच्या तरुणांना स्फूर्ती देणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here