Home Education मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयाची झेप

मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयाची झेप

167

🔹कौस्तुभच्या नेतृत्त्वात खो- खो संघाला मिळाले यश

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियूष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.23डिसेंबर):-वर्धा येथे झालेल्या १९ वर्षाआतील जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धेत मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा घाडगे येथील चमू विजयी होऊन नागपुर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर निवड झाली आहे.मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजाने पहिला सामना आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय हिंघनघाट तसेच दुसरा सामना जी. एस. कॉमर्स कॉलेज वर्धा यांच्यासोबत जिंकला. अंतिम सामना मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय आर्वी विरुद्ध मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा घाडगे यांच्यासोबत झाला होता त्यामध्ये मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा घाडगे यांनी विजय संपादन केले.

आता विभागीयस्तरावर नागपुर येथे खो – खो संघाची निवड झाली आहे.या संघाचे नेतृत्व कौस्तुभ डोंगरे याने केले तर संघात प्रज्वल भस्मे,सुमित चौधरी,उदय कडवे,दीपक मख,वैभव खवसे, सुमित बारंगे,हर्षल चोपडे,अभिष सूर्जुसे,मयुरी गिरी,सागर येडमे, अमर मडावी यांचा समावेश होता.या विजयाबद्दल भारत शिक्षण संस्थेच्या सचिव शोभा काळे,संदीप काळे,मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. बी. टोपले, विभागप्रमुख प्राध्यापिका मंजुषा देशमुख,क्रीडा प्रशिक्षक प्रा.मनोज काळे,चंद्रशेखर गिरहाळे यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here