Home Education महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा

महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा

91

🔸गणितज्ञ रामानुजन यांचे जीवनकार्य प्रेरणादायी – जे.एस.पवार[ मुख्याध्यापक ]

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.२२डिसेंबर):-गुरूवार रोजी स्थानिय महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार अध्यक्षस्थानी होते. गणित विषय शिक्षक एम बी मोरे व एम जे महाजन यांच्या हस्ते गणितज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी गणित विषय शिक्षक सी एम भोळे यांनी गणित दिना संदर्भात विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी विद्यार्थ्यांना रामानुजन यांचा जीवनपट सांगितला. गणित विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. गणितीय सूत्र हसत – खेळत लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यांना गणित विषयाची प्रेरणा व गोडी निर्माण व्हावी यासाठी या वर्षापासून ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग दहावीमध्ये एस एस सी बोर्डच्या परिक्षेत गणितामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले तर माझ्याकडून पाच हजार एक रुपयाचे बक्षीस देईल असे आश्वासन दिले व सर्व विद्यार्थ्यांना गणित दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शाळेतील जेष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे, एस.व्ही.आढावे, एच.डी. माळी, पी.डी.पाटील, व्ही.टी.माळी, श्रीमती व्ही.पी.वऱ्हाडे, ग्रंथपाल गोपाल महाजन , अशोक पाटील, जीवन भोई तसेच शाळेतील शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here