Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

128

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.15डिसेंबर):-महाराष्ट्रात कुस्ती या खेळास लोकाश्रय व राजाश्रय मिळाला. रामायण महाभारतात कुस्ती खेळाचा उल्लेख असून आज कुस्ती मातीतून मॅटवर आलेली आहे. कराड नगरपालिकेने कुस्तीसाठी आखाडा बांधून कुस्ती खेळास प्राध्यान्य दिले. या स्पर्धेसाठी प्राध्यापक, कोच, पंच खेळाडू कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केल्याने स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या.” असे प्रतिपादन मा. आल्ताफ़ हुसेन मुल्ला यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज कराड आयोजित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आंतरविभागीय कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मा. रामभाऊ कणसे हे होते. श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे सदस्य मा. नंदकुमार बटाणे यांनी शेवटच्या दिवशी कुस्ती स्पर्धांचा प्रारंभ करून पैलवानांना शुभेच्छा दिल्या.          

           वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड आयोजित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आंतरविभागीय कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) 2022-23 अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडल्या.

या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. प्रकाश पांडुरंग पाटील ( बापू ) यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. महिला गटातील कुस्ती स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड या कॉलेजने  पटकावले. पुरुष गटातील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा कॉलेजला मिळाले तर पुरुष गटातील ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद दत्त द्वारका कॉलेज, वाकरे ता. करवीर या महाविद्यालयास मिळाले. विजेत्या महाविद्यालयास प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व कायम स्वरूपी फिरता चषक (ढाल) देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धक (पुरुष व महिला) खेळाडू यांच्या विविध वजन गटात या कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या.

      वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “स्वप्न पाहणारे अनेकजण असतात पण सत्यात उतरवणारे फार कमी असतात. मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाटी खेळ महत्वाचे असतात, अशी छत्रपती राजर्षी शाहू यांची इच्छा होती. गेले तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी अनेकांनी सहकार्य केले. आपण कुस्ती स्पर्धेतील थरार अनुभवला. अशा मोठ्या उपक्रमांना श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडचे जनरल सेक्रेटरी मा. प्रकाश पाटील (बापू )नेहमीच प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करत असतात.”

   यावेळी प्रा. यवन आवळे यांनी मनोगत व्यक्त वेणूताई चव्हाण कॉलेजने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धासारखे सर्वोत्कृष्ट नियोजन व संयोजन केले असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री रामभाऊ कणसे म्हणाले की, “कुस्ती हा भारताचा पारंपरिक खेळ आहे. पैलवान खाशाबा जाधव यांच्यामुळे कुस्तीत कराडचा नावलौकिक झाला. महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात पार पडत असतात असेही ते म्हणाले.

       या  कार्यक्रमास  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक, प्रा. पी. टी. गायकवाड, पुरुष कुस्ती स्पर्धा निवड समितीचे चेअरमन प्रा. बी. डी. पाटील, सदस्य व्ही. बी. पाटील डॉ. यवन ऐवळे, प्रा. सूर्यकांत शिंदे, महिला कुस्ती स्पर्धा निवड समिती चेअरमन डॉ. महेंद्र कदम पाटील, निवड समिती सदस्य डॉ. विक्रमसिंह नांगरे पाटील, डॉ. सतीश माने, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच मा. दिलीपबापू पवार, सातारा विभागीय क्रीडा परिषदेच्या सचिव प्रा. श्रीमती स्मिता कुंभार, तसेच दिलीप पवार, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत केंगार, क्रीडा शिक्षण संचालक प्रा. विलास डाफळे, प्रा. ए. जे. सावंत, उपस्थित होते.

    प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. दिग्विजय पाटील यांनी करून दिला तर सूत्रसंचालन प्रा. सौ. एस. डी. पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. डॉ. महेंद्र कदम पाटील यांनी मानले. या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कराड परिसरतील अनेक कुस्ती रसिक आवर्जून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here