Home महाराष्ट्र व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास मोलाचा असतो-नितीनकुमार देवरे

व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास मोलाचा असतो-नितीनकुमार देवरे

97

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.21डिसेंबर):- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ उत्साहात संपन्न झाले. भारतीय संस्कृती, देशभक्ती, परंपरा, देशाच्या समस्या, लोकनृत्य इ. विविधरंगी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगावचे तहसिलदार नितीनकुमार देवरे तर प्रमुख अतिथी म्हणून पी.आर.हायस्कूल चे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच आलेल्या मान्यवरांचे ऋण व्यक्त केले.

शिक्षिका भारती तिवारी यांनी आपल्या मधुर आवाजात स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरवात अतिशय मंगलमय वातावरणात दीपप्रज्वलनाने झाली. तद्नंतर लक्ष्मणराव पाटील यांनी आलेल्या अतिथी मान्यवरांचा परिचय करून दिला. भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या सर्व अतिथींचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व स्टाफ ने अतिशय परिश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे तोंडभरून कौतुक केले.

शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी कार्यक्रमाला सदिच्छा व्यक्त केल्या. प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी कामाच्या व्यस्ततेमुळे भ्रमणध्वनी द्वारे सदिच्छा कळवल्या. साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे सरांनी सांगितले की, शाळेचा आवाका लहान असला तरी इथे कार्य करणारे सर्वच मनाने खूप मोठे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनकुमार देवरे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. “व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास अतिशय मोलाचा असतो”, असे प्रतिपादन तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी व्यक्त केले. औपचारिक उदघाटन समारंभ आटोपल्यावर सर्व मान्यवरांनी समोर बसून कार्यक्रमाला मनापासून दाद दिली.

ज्या कार्यक्रमाची सर्व आतुरतेने वाट पाहत होते त्या कार्यक्रमाला सुरवात झाली. वेलकम डान्स, पापा मेरे पापा, हर हर शंभू, बुम बुम डान्स, मिक्स लावणी, गोवा सॉंग, माय भवानी, शोले डान्स, कोरोना थीम डान्स, वाया वाया डान्स, पथनाट्य, कदम कदम मिलाये, ऐगिरी नंदिनी, ड्रामा, ओल्ड रिमिक्स, इमोशनल थीम, मेरी माँ के बराबर…, मराठी रिमिक्स, नैनोवाले ने जादू डाला, कोरोना थीम परफॉर्मन्स, लेझी डान्स, मिरची लावणी मॅशप, डान्स का भूत, पिरॅमिड आणि शेवटी ऑल टीचर्स डान्स अशा एकूण २५ कार्यक्रमांनी आपल्या बहारदार परफॉर्मन्स च्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

नर्सरी च्या चिमुकल्यांपासून ते दहावीच्या विद्यार्थांपर्यंत सर्वांनीच एकापेक्षा एक सादरीकरण करून भारतीय संस्कृती आणि परंपरा, देशभक्ती, कोरोना, देशाच्या समस्या, लोकनृत्य, वेस्टर्न डान्स, पारंपरिक नृत्य, लावणी, आई – वडिलांचे प्रेम, साऊथ इंडियन यांचे दर्शन घडवले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनी पूर्वा जाला, श्रेया भावे, करिष्मा जावरे, मनस्वी पाटील, मनस्वी पवार, नेहा राजपूत, कृपा पांडे, प्रांजल शिंदे आणि नववीचे विद्यार्थी कुणाल चव्हाण, झेद खाटीक यांनी केले. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सेट करण्यासाठी शाळेच्या शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून म.प्र.काँ.चे माजी प्रदेश सचिव डी.जी.पाटील, अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ, गुरुकुल स्कुलच्या प्राचार्या वैशाली पवार, माजी सभापती दिपक सोनवणे, कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी, समाजकल्याण विभागाचे समीर भाटीया, सिंधू गार्डन चे संचालक साहेबराव महाजन, अमोल रेसिडेंसी चे संचालक रविंद्र हरपे, शा.भ्र.नि.स.जळगाव जिल्हा अशासकीय सदस्य रविंद्र कंखरे, पवार पेट्रोलियम चे संचालक चंदन पाटील, पत्रकार भगीरथ माळी, धर्मराज मोरे, पी.डी.पाटील सर, अविनाश बाविस्कर, मंगेश पाटील, विकास पाटील तसेच मोरे सर, असलम भाई, निजाम भाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला होमगार्ड पथक, आनंद टेंट हाऊस, डीजे गोलू, वास्तव डिजिटल, महाजन फोटो स्टुडिओ यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल श्रीमावळे, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन नाजनिन शेख यांनी तर अतिशय गोड शब्दात आभार प्रदर्शन सपना पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here