✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.21डिसेंबर):-शासनाच्या वतीने दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अवघड होत असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत विशिष्ट आदेश काढून तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग नागरिकाची तपासणी होऊन प्रमाणपत्र देण्यासाठी आदेशित असल्यामुळे दिव्यांगांना सोपे काम झाले आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत येणारे डॉक्टर पथक आठवड्यातील प्रत्येक बुधवारी येत नसल्यामुळे दिव्यांग उमेदवाराच्या अडचणीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.
गंगाखेड तालुक्यातील खेडेगावातील दिव्यांग नागरिक प्रमाणपत्रासाठी येत असल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासूनच रुग्णालयामध्ये दाखल होतात उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणाहून येणारे डॉक्टर पथक आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी येणे अपेक्षित असताना अचानक डॉक्टर पथक यांचा दौरा रद्द होत दिव्यांग प्रमाणपत्र न घेता दिव्यांग नागरिकांना घरी वापस जावे लागत आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील भिंतीवरील मोबाईल नंबर व संपर्क साधला असता सर्व नागरिकांची लिस्ट तयार करून तक्रार देण्यात यावी व पुढील बुधवारी दिव्यांग तपासणी केली जाईल असे फोनवरून सांगण्यात आले. दिव्यांग नागरिकांचे हल पाहता जिल्हा आरोग्य अधिकारी या बाबीकडे लक्ष येतील का? दिव्यांगाच्या अन्यायाला वाचा फोडतील का? असे दिव्यांग नागरिकांना मनातून वाटते.