Home महाराष्ट्र बहुचर्चित ग्रामपंचायत निवडणूक मध्ये अखेर सुवर्णा चंद्रकांत सावळे विजयी..!

बहुचर्चित ग्रामपंचायत निवडणूक मध्ये अखेर सुवर्णा चंद्रकांत सावळे विजयी..!

112

✒️पी.डी पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.20डिसेंबर):- जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली . धार ता. धरणगाव येथे मतदान प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी वार्ड क्र एक च्या उमेदवार सुवर्णा चंद्रकांत सावळे यांचे पती चंद्रकांत सावळे यांच्यावर गावातील काही लोकांनी हल्ला केला होता त्या बाबतीत त्यांनी पाळधी पोलीस स्टेशन ला माहिती देत नंतर थेट जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आपल्यावर झालेल्या आपबिती संदर्भात धाव घेतली होती . आज दि 20 डिसेंम्बर 2022 रोजी धरणगाव येथे मतमोजणी झाल्यानंतर चुरशीच्या झालेल्या लढत मध्ये धार ता धरणगाव येथील जनरल जागेवर अनुसूचित जातीच्या अपक्ष उमेदवार सुवर्णा चंद्रकांत सावळे (अपक्ष ) वार्ड क्र 1 जनरल कोट्यातून उमेदवार यांचा 163 मते मिळवत 40 मतांची आघाडी घेत विजय मिळवला . विजयाची घोषणा होतच त्यांना सुखद धक्का मिळाला व समर्थकांनी एकच जल्लोष केला .

त्यांच्या विजयाने समाजातील विविध पदाधिकारी ,नेते यांच्या शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. विजयाबद्दल बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हा संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , शिवनसेना शिंदे गटाचे जिल्हा मागासवर्गीय अध्यक्ष मुकुंद नंनवरे, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे धरणगाव तालुका अध्यक्ष निलेश पवार , भारत मुक्ती मोर्चा चे तालुका अध्यक्ष गौतम गजरे , राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष गोरख देशमुख , भारतीय युवा मोर्चाचे आकाश बिवाल व अनेक संघटना ,समविचारी बांधवानी अभिनंदन केले.

———————————————–

हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. आम्ही शाहू ,फुले , आंबेडकर , व समता वादी विचारांचा वारसा चालवतो . ज्या वार्ड मध्ये अतिशय बोटावर मोजण्या इतके मतदान मला मिळेल असे वाटणार होते तिथं मला भरघोस आघाडी देत विजयच्या शिखरावर नेले या बद्दल सर्वसामान्य मायबाप मतदार यांचे आभार.

सुवर्णा चंद्रकांत सावळे
विजयी उमेदवार – धार ता धरणगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here