Home महाराष्ट्र गाडगे बाबांच्या स्मृती दिनी विद्यार्थ्यांनी घेतला व्यसन मुक्ती चा संकल्प

गाडगे बाबांच्या स्मृती दिनी विद्यार्थ्यांनी घेतला व्यसन मुक्ती चा संकल्प

221

🔸पी एस खंदारे यांनी गाडगे बाबांच्या वेशभूषा करून केले समाज प्रबोधन

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
सुपखेला(दि.20डिसेंबर):-येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांचा स्मृती दिन व्यसन विरोधी अभियानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ काळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जिल्हा कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे हे होते पी. एस. खंदारे यांनी निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या वेशभूषा करून समाज प्रबोधन करतांना संत सुधारकांचा विवेकी वारसा समाजात रूजवून अंधश्रद्धा व व्यसनापासून दूर रहावे म्हणून विविध दाखले देत व्याख्यान दिले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मूकनायक विचार मंच वाशिम च्या वतीने चला व्यसनाला बदनाम करूया या व्यसन विरोधी अभियानाची विस्तृत माहिती देऊन व्यसनाचे दुष्परिणामांचा वस्तुनिष्ठ परिपाठ व समाजात घडणा-या घटना सांगीतल्या व शेवटी व्यसनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा वदवून घेतली विद्यार्थ्यांनी गाडगे बाबांच्या जिवनावर भाषने केली तर मुख्याध्यापक काळे यांनी गाडगे बाबांचे जिवनपटावर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महेश देवळे यांनी केले तर आभार व सुत्रसंचालन विद्यार्थीनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गंगावणे, खडसे, भोसले, राऊत मॅडम, भगत मॅडम, पतंगे मॅडम यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here