Home Education ऑल इंडिया आयडियल टिचर असोसिएशन तर्फे टी,ई,टी च्या मागर्दशनासाठी प्रा.सय्यद सलमान सन्मानित

ऑल इंडिया आयडियल टिचर असोसिएशन तर्फे टी,ई,टी च्या मागर्दशनासाठी प्रा.सय्यद सलमान सन्मानित

92

🔸टी.ई.टी परीक्षेसाठी प्रा. सय्यद सलमान सरांनी मराठी विषया करिता ऊर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना केले होते मोफ़त ऑनलाइन मागर्दशन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ – पुसद(दि.20डिसेंबर):-पुसद मध्ये नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील सामजिक व विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात नेहमी तत्पर असुन वेग वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यासाठी नेहमी चर्चेत मध्ये असणारे प्रा.सय्यद सलमान सरांना (AIITA)ए.आय,आय.टा या शिक्षकांच्या सर्वांत मोठया संघटनेतर्फे सन्मानित करण्यात आले आयटा तर्फे मिशन टी, ई,टी मध्ये हा एक उपक्रम राबविला होता त्यामध्ये महाराष्ट्रातील हजारो उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला होता त्यांना वेळो वेळो झूम ऑप च्या माध्यमातून मोफत ऑनलाइन मार्गदर्शन सुरू होते.

या मध्ये शिक्षकांनी टी, ई,टी च्या वेग वेगळ्या विषयावर वेळो वेळी विद्यार्थ्यांना मोफ़त मागर्दशन केले त्या मध्ये अनेक शिक्षक होते ज्यांनी आपल्या विषया बद्दल विद्यार्थ्यांना मोफ़त असे मागर्दशन केले त्यामुळे सम्पूर्ण महाराष्ट्र राज्यातून उर्दू माध्यमातील 95 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे या परीक्षेत ज्या शिक्षकांनी मोलाचे मागर्दशन मोफ़त केले अश्या शिक्षकांचा औरंगाबाद येथे आयटा च्या पदाधिकाऱ्यां तर्फे सत्कार करण्यात आला या मध्ये पुसद येथील प्रा.सय्यद सलमान सरांचा सुद्धा ट्राफि आणि प्रमाणात देऊन सत्कार करण्यात आला सरांनी TET च्या उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना दुसरा पेपर असलेल्या मराठी भाषेच्या पेपरसाठी सय्यद सलमान सरांनी मोफ़त मागर्दशन केले आणि वेळो वेळी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसरण केले त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा झाला अश्या या कार्यासाठी प्रा.सय्यद सलमान सरांना सन्मानित करण्यात आले.

सर अश्या शैक्षणिक कार्यात सर नेहमीच हिर हिरीने भाग घेतात.

(आयटा) ही एक भारतातील सर्वांत मोठी शिक्षक संघटना आहे जी शिक्षकांच्या उन्नतीसाठी कार्य करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here