Home Education तलवाडा पो.स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भवर यांना नक्षलग्रस्त भागातील विशेष सेवा पदक...

तलवाडा पो.स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भवर यांना नक्षलग्रस्त भागातील विशेष सेवा पदक जाहिर!

201

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.19डिसेंबर):- तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामीण पोलीस स्टेशन म्हणून परिचित असलेल्या तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भवर हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पिंपळवडी या गाव खेड्यातील रहिवाशी आहेत. ते सर्वसामान्य कुटुंबातील असून; त्यांचे शिक्षण देखील ग्रामीण भागात झालेले आहे. शिक्षणात बुध्दीमान, गुणवान व जिद्दी असल्यामुळे त्यांचे पोलीस होण्याचे स्वप्न पुर्णत्वास गेले. ते पोलीस खात्यात रूजू होताच त्यांची प्रथम नेमणूक नक्षलग्रस्त भागात म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात झाली.

त्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी तब्बल 42 महिने प्रमाणिकपणाने कर्तव्यदक्ष सेवाभावी वृत्ती मनाशी बाळगून नौकरी केली. याच कार्याची दखल घेवून राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी नक्षलग्रस्त भागात गडचिरोली जिल्ह्यात सेवा बजावल्यामुळे सध्या कार्यरत असलेले तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भवर यांना विशेष सेवा पदक जाहिर केले आहे. त्यांना यासाठी लवकरच सन्मानित देखील केले जाणार असल्याचे महासंचालक रजनीश सेठ यांनी आदेशात म्हटले आहे.

बाळासाहेब भवर हे तलवाडा पोलीस स्टेशन सारख्या ग्रामीण भागात देखील आज रोजी प्रमाणिक, कर्तव्यदक्ष, निशकलंक अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांना विशेष सेवा पदक जाहिर झाल्यामुळे बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांढरकर, गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, तलवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे सह पोलीस खात्यातील, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कृषी क्षेत्रातील व्यक्तीकडून त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात असुन पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

करो, करो, जल्दी गर्व करो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here