Home चंद्रपूर एकारा येथील आश्रम शाळेला सदिच्छा भेट देऊन व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन शिबीर व...

एकारा येथील आश्रम शाळेला सदिच्छा भेट देऊन व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन शिबीर व शालेय पुस्तक वाटप

97

🔸न्यु लाईफ बहूउद्देशिय संस्था, ब्रम्हपुरी मार्फत विशेष उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18 डिसेंबर):- तालुक्यातील एकारा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत दि.18/12/2022 रोजी रविवारला ब्रम्हपुरी शहरातील सामाजिक कार्य करणारी न्यु लाईफ बहूउद्देशिय संस्थेमार्फत सदिच्छा भेट देऊन, तेथील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन शिबीर घेण्यात आला. आणि सर्व विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत शालेय वस्तू (बुक, पेन, पेन्सिल, रबर) भेट स्वरूपात देण्यात आले.

ह्या उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून सामाजिक संस्थेचे सचिव श्री.उदयकुमार पगाडे यांनी शालेय जीवनातील अभ्यासक्रम किती महत्वाचे असते, त्यातून वरिष्ठ अधिकारी कस बनता येईल, हे समजावून सांगितले. तसेच युवा समाजसेविका पूनम कुथे मॅडम यांनी वैचारिक, सामाजिक, व्यवहारीक व इतर गोष्टी समजावून सांगितले.

ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून- सौ.लोणकर मॅडम (माध्यमिक मुख्याध्यापिका), प्रमुख पाहुणे- श्री. तुळसीदास प्रधान सर (प्रभारी प्राथमिक मुख्याध्यापक), श्री.ठाकरे सर (अधिक्षक), खराबे मॅडम (अधिक्षीका), श्री. विलास मोटघरे सर (लिपिक), सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा पूनम कुथे मॅडम, उपाध्यक्ष श्री.अरविंद नागोसे सर, सचिव श्री.उदयकुमार पगाडे सर, सदस्य- सौ.प्रिया नागोसे मॅडम, भूषण आंबोरकर, प्रशांत खोब्रागडे, शुभम करंडे, खेमचंद वसाके इत्यादी व्यक्ती प्रामुख्याने उपस्तिथ होते.

करो, करो, जल्दी गर्व करो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here