✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.18डिसेंबर):-ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील 6 कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी व केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा केला. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 6 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वडवणीचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी दिले आहेत. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
ग्रामपंचायत निवडणुकीत वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील 6 कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा केला. त्यामुळे तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस. के. मंदे यांना प्राधिकृत केले. तसेच त्यांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत. आदेशाची प्रत वडवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिली गेली आहे. रात्री उशिरापर्यंत वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.