Home बीड गावचा कारभारी कोण? 7 हजार 751 ग्रामपंचायतींकरिता मतदान सुरू

गावचा कारभारी कोण? 7 हजार 751 ग्रामपंचायतींकरिता मतदान सुरू

155

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.18डिसेंबर):-आज रविवार 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. विविध जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होणार आहे. अनेकांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे

राज्यातील मुदत संपलेल्या 7751 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होत आहे. मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. महाराष्ट्रात सध्या ग्रामपंचायत निवडणूकींची धुमाळी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

अशातच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी सांगली जिल्ह्यात नरवाड एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदारांना उमेदवारांकडून आमिष : मतदानाच्या पूर्वसंध्येला सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये साड्या आणि पैसे वाटप करण्यात आल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आचारसंहिता भरारी पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर पथकाकडून नरवाड गावामध्ये दाखल होऊन रस्त्यावर साड्या आणि पैशांच्या नोटा आढळून आले आहेत. पथकाकडून या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मतदारांना उमेदवारांकडून आमिष : मतदानाच्या पूर्वसंध्येला सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये साड्या आणि पैसे वाटप करण्यात आल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आचारसंहिता भरारी पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर पथकाकडून नरवाड गावामध्ये दाखल होऊन रस्त्यावर साड्या आणि पैशांच्या नोटा आढळून आले आहेत. पथकाकडून या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

जालना जिल्ह्यात १६ ग्रामपंचायती बिनविरोध राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे भोकरदन तालुक्यातील जन्मगाव असलेले जवखेडा खुर्द गावची ग्रामपंचायत गेल्या 30 वर्षापासून बिनविरोध होत आहे. परंतु यावर्षी या ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. याच ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची राजकीय कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील होत असलेल्या 266 पैकी 16 ग्रामपंचायतचे सरपंच आणि 333 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

ग्रामपंचायतीत २० वर्षानंतर निवडणूक बीड जिल्ह्यात एकूण 704 ग्रामपंचायतची रणधुमाळी चालू आहे. याच रणधुमाळीमध्ये बीड शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सौंदाना या गावातील तब्बल वीस वर्षानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत लोक मतदान करणार आहेत. गेली 20 वर्ष मात्र या गावची ग्रामपंचायत ही बिनविरोध होती.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात काय आहे परिस्थिती? ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचात निवडणुकीत भिवंडी तालुक्यात १४ , मुरबाड तालुक्यात १४ तर कल्याण तालुक्यातील ९ तसेच शहापूर तालुक्यातील ५ अश्या ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी सर्वाधिक भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात १४ – १४ ग्रामपंचायत निवडणुका असून भिवंडी ग्रामीण मधून शिंदे गटाचे आमदार तर मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार आहे.

४२ उमेदवार रिंगणात – भिवंडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर थेट 13 सरपंच निवडीच्या निवडणुकीत सर्वाधिक ४२ उमेदवार रिंगणात आहे. शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या मूळ गाव असलेल्या खानीवली ग्रामपंचायतीतील सरपंच पदासह सातही सदस्य बिनविरोध निवडल्याने गावावर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. मात्र भिवंडीतील कोनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपामध्ये बंडखोरी झाल्याने इतर ठिकाणीही त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here