Home बीड ग्रामपंचायत निवडणुकीचा थरार; सत्तेसाठी चक्क मामावर तलवारीने केला हल्ला

ग्रामपंचायत निवडणुकीचा थरार; सत्तेसाठी चक्क मामावर तलवारीने केला हल्ला

163

🔸जिल्ह्यातील खळबळजनक घटना..!
___________________

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.17डिसेंबर)’-बीडच्या दगडी शहाजानपूर गावात ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सुरु आहे. कालच प्रचाराचा शेवटचा दिवस होता. काल सायंकाळच्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाच्याने मामावर चक्क तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आलाय. पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याअगोदरच पोलिसांनी भाच्याला पकडले. त्यामूळे मोठी दुर्घटना टळली.

प्राप्त माहितीनुसार, शिवाजीराव चव्हाण असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तलवारबाजी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मामा चव्हाण आणि भाचा जाधव या दोघांची भेट बीड येथील राजीव गांधी उद्यानासमोर झाली. शाब्दिक बाचाबाचीतून हाणामारी जुंपली भाचा धोंडीराम जाधवने मामावर तलवारीने वार केला तेवढ्यात जवळच चौकात उभे असलेल्या दोन पोलीस हवालदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानी तलवार जप्त केल्याने अनर्थ टळला. सध्या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निवडणूकीचा अर्ज भरण्याआधी अपहरण

सांगली ग्रामपंचायत निवडणूकीत देखील असाच धक्कादयक प्रकार पाहायला मिळाला होता. गावात ६ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे एका उमेदवाराने दुसऱ्या इच्छुक उमेदवाराचे अपहरण केले. तसेच शेवटची दिनांक उलटून गेल्यावर त्याला सोडण्यात आले. सदर घटनेत अपहरण झालेल्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here