Home पुणे कर्मयोगी संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त बाराव्या राज्यस्तरीय भव्य चिञ रंगभरण स्पर्धेचे आयोजन

कर्मयोगी संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त बाराव्या राज्यस्तरीय भव्य चिञ रंगभरण स्पर्धेचे आयोजन

64

🔹संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनकार्यावर ही स्पर्धा

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.16डिसेंबर):-साई कला आविष्कार नाट्य संस्था,पुणे ३९ वतीने दरवर्षी विद्यार्थी वर्गात थोर व्यक्तींच्या कार्याचा परिचय विद्यार्थी वर्गास व्हावा.कलेची आवड निर्माण व्हावी.यासाठी संपुर्ण महाराष्टातील इंग्रजी व मराठी माध्यमातील शाळांमध्ये इ.१ ली ते इ.१० वी विद्यार्थ्यांसाठी आयोजन दरवर्षे केले जाते.हजारों विद्यार्थी यात सहभाग घेत असतात.कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

यापुर्वी अनेक थोर व्यक्तिमत्वाच्या जीवनावर स्पर्धा राबविण्यात आलेल्या आहेत.यावर्षी *संत ज्ञानेश्वर महाराज* यांच्या जीवनकार्यावर ही स्पर्धा आयोजित केलेली आहे.या स्पर्धेत प्रत्येक सहभागी विद्यार्थाला आकर्षक फोरकलर सन्मानपञ,संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावरील रेखाटलेले रेखाचिञ रंगभरण करण्यासाठी देण्यात येणार आहे.

यात इ.१ ली ते इ.१० वी विद्यार्थीनी सहभाग घेण्याचे आवाहान संस्थे तर्फे करण्यात आले आहे.शालेय स्तरावर तीन क्रमांक काढण्यात येणार आहे.विजेत्यांना बक्षिस देण्यात येणार आहे.कला शिक्षक व मुध्यापकांना “राज्यस्तरीय सहभाग दौलत गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात येणार आहे.विजेत्यांच्या चिञांचे “आविष्कार रंग”या नावाने चिञ प्रदर्शन पुणे येथे भव्य कार्यक्रम घेऊन करण्यात येणार आहे.

या स्पर्धेला जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे,असे आवाहान करण्यात येत आहे,सहभागी शाळांनी आपल्या शाळेची सहभागी विद्यार्थी संख्या *पुढील मोबाईवर -९६५७३४८६२२ वर SMS दवारे कळवावी*,अथवा फोन करुन कळवावी.त्यांना त्यांच्या विद्यालयात चिञे रंगभरण स्पर्धेसाठी विनामूल्य पाठविण्यात येईल.तसेच या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी केवळ वीस रुपये स्वागतमूल्य ठेवण्यात आले आहे.आधिक माहितीसाठी प्रा.राजेंद्र सोनवणे,अध्यक्ष-साई कला आविष्कार नाट्य संस्थेशी संपर्क-९६५७३४८६२२ वर साधावा.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांची रुजवणूक व्हावी.कलासक्त नागरीक घडावे.या स्पर्धेमागचा खरा हेतू आहे.असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here