Home महाराष्ट्र दलित पँथर संघटनेचे कार्य कौतुकास्पद: राजकुमार भुजबळ

दलित पँथर संघटनेचे कार्य कौतुकास्पद: राजकुमार भुजबळ

125

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.15डिसेंबर):-दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर मा.बाळासाहेब पडवळ व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पॅंथर डाॅ.मा.घनश्याम भोसले यांचे नेतृत्वाखाली दलित पँथरचे माण तालुका अध्यक्ष धाडसी नेतृत्व पँथर मा.प्रमोद नंदकुमार लोखंडे व सर्व पॅंथर कार्यकर्ते यांच्या आयोजनातुन आणि सामाजिक विचारांतून बुधवार दिनांक 14/12/2022 रोजी सकाळी ठिक 9 वाजले पासून ते दुपारी ठिक 3 वाजेपर्यंत “नेत्र तपासणी व मोफत ऑपरेशन शिबीर” मोठ्या उत्साहात पार पडले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक मा.राजकुमार भुजबळ (API म्हसवड पोलीस ठाणे म्हसवड) व मा.करण विजय सिन्हा (जागतिक राजकारण अभ्यासक, युवा सामाजिक कार्यकर्ते) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आक्रमक पँथर मा.घनश्याम भोसले (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दलित पँथर) व मा.सचिन माने (मुख्याधिकारी म.न.पा.म्हसवड) व डॉ.वाघमारे साहेब (एच.व्ही.नेत्र रूग्णालय महंमदवाडी पुणे) यांचे हस्ते व प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलित करून कार्यक्रमास मंगलमय सुरुवात करण्यात आली.

यावेळी उदघाटन प्रसंगी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ म्हणाले दलित पँथर संघटनेचे कार्य हे नेहमीच कौतुकास्पद असते आज या संघटनेने आबालवृद्धासाठी आणि गरीब गरजू लोकांसाठी जे मोफत नेत्रदान आणि आरोग्य शिबीर राबविले आहे हे अतिशय महत्वाचे आहे याचा म्हसवड शहरासह आसपासच्या गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचे सामाजिक कार्य दलित पँथर संघटनेने भविष्यात करत रहावे ही अपेक्षा करतो.

त्यावेळी उपस्थित मा.धर्मराज लोखंडे संस्थापक माणदेश शिक्षण संस्था, मा.लक्ष्मण काकडे सातारा जिल्हा अध्यक्ष दलित पँथर, मा.किरण बनसोडे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष दलित पँथर, मा.सोनू शिंदे शिबीर व्यवस्थापक, मा.नवनाथ लोखंडे संपर्क प्रमुख माण दलित पँथर, मा.भिमराव साठे शिवसेना नेते माण, मा.शहाजी लोखंडे वंचित शहर अध्यक्ष म्हसवड, मा.संतोष लोखंडे वंचित तालुका उपाध्यक्ष माण, मा.विक्रम लोखंडे म्हसवड शहर अध्यक्ष दलित पँथर, मा.आकाश बाबा माने राष्ट्रवादी, मा.सचिन लोखंडे राष्ट्रवादी,मा.विकी लोखंडे युवा कार्यकर्ते, मा.नितीन तुपे पत्रकार, मा.राजेश लोखंडे युवा कार्यकर्ते व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दलित पँथर सामाजिक संघटनेकडून माण तालुका व म्हसवड शहरात नेहमीच समाजहिताचे कार्य जोपासले जाते! म्हणून कार्यक्रमाच्या सर्वच मान्यवरांनी व म्हसवड शहर व परीसरातील जेष्ठ नागरिकांनी शिबिराचे व दलित पँथर संघटनेचे विषेश कौतुक करून समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here