✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.13डिसेंबर):-मौजे बोरफडी ता जि बीड येथील मंजुळाबाई निवृत्ती ठोंबरे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे ०४ वाजता निधन झाले असून मौजे बोरफडी ता जि बीड येथे सकाळी ०९ : ३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारा वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
गुरुवार दिनांक १५ डिसेंबर रोजी रक्षा सांवडण्याचा कार्यक्रम बोरफडी येथे आहे.
मंजुळाबाई या भायाळा येथील स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक आश्रुबा बांगर यांच्या भगिनी तर माजी सैनिक केशव बांगर यांच्या आत्या आणि मौजे जोला येथील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांच्या आजी होत्या. मंजुळाबाई निवृत्ती ठोंबरे यांच्या पश्चात मारोती ठोंबरे हा मुलगा व रुक्मिणीबाई ढाकणे व सत्यभामा घोळवे या दोन मुली आहेत आणि ११ नातवंडे आहेत.