Home महाराष्ट्र विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक संपन्न…

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक संपन्न…

113

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.12डिसेंबर):– येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन भवनात आज विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठक भ.नि.स.अ. तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त (महसूल) उन्मेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम वि.भ.नि.स.अशासकीय सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.तद्नंतर अध्यक्ष म.आयुक्त महोदयांनी समितीचा कार्यकाळ, कार्यकक्षा, कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. आज रोजी एकही प्रलंबित अर्ज नसल्याने बैठकीची सांगता चहापानाने झाली.

याप्रसंगी वि.भ.नि.स.अशासकीय ५ सदस्यांपैकी ३ सदस्य बैठकीला हजर होते. यामध्ये निवृत्ती बळवंत कापसे (गणेशगाव पो.पिंपळगाव गरुडेश्वर, नाशिक), सरदारसिंग रूपसिंग वसावे (मु.पो.मोलगी ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार), लक्ष्मण प्रभाकर पाटील (धरणगाव ता.धरणगाव जि. जळगांव) उपस्थित होते. याप्रसंगी म. आयुक्त राधाकृष्ण गमे, म. उप आयुक्त उन्मेश महाजन यांच्या हस्ते अशासकीय सदस्यांना बैठकीचा अहवाल देण्यात आला.

कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here