Home महाराष्ट्र इतिहासाच्या प्रेरणे शिवाय आत्मसन्मान जागृत होत नाही – डी.बी.अंबुरे

इतिहासाच्या प्रेरणे शिवाय आत्मसन्मान जागृत होत नाही – डी.बी.अंबुरे

123

✒️अमोल उत्तम जोगदंडे(धनज प्रतिनिधी)मो:-8806583158

धनज(दि.12डिसेंबर):-ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही,तो समाज आपला इतिहास निर्माण करु शकत नाही.असे डाॅ.बाबासाहेब आंबेडर यांनी म्हटले आहे.आदिवासी समाजाला आपला आत्मसन्मान जागृत करण्यासाठी इतिहास माहीत करुन घेणे आवश्यक आहे.१७५७ ते १८५७ व १८५८ ते १९४७ पर्यंत १९२ वर्षाच्या कालखंडात अनेक आदिवासी क्रांतिकारक या माय भूमिला परकियांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी शहीद झाले.

बिरसा मुंडा,तंट्या मामा,राघोजी भांगरे,बाबुराव शेडमाके,शंकरशहा रघुनाथ शहा,विर नारायनसिंह,राणी दुर्गावती,राणी झलकारी,अश्या एक नाही तर अनेक क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा दिली.तर काही क्रांतीकारकांना भर चौकात तोफेच्या तोंडाला बांधून उडवून दिले.पण इथल्या व्यवस्थेने आदिवासीचा इतिहास समोर येवू दिला नाही.आदिवासी क्रांती वीरांचा इतिहास सर्वसामान्य मानसापर्यंत आल्याशिवाय आत्मसन्मानाचे आंदोलन निर्माण होणार नाही.आत्मसन्मानाचे आंदोलन इतिहासाच्या प्रेरणेशिवाय निर्माण होत *नाही.असे प्रतिपादन बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष डी.बी.अंबुरे यांनी केले.

कवाना ता.हदगांव येथे समाजप्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. *कार्यक्रमाचे उदघाटक मा.आमदार माधवराव पाटील जवळगांवकर होते* अध्यक्षस्थानी मा.सौ.नंदाबाई पाटोदे होत्या.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डाॅ.सतिष पाचपुते,ठाणेदार विनोद चव्हाण,नारायणराव पिलवंड,संतोष डवरे,रामराव मिराशे,हेमंत नरवाडे,अनंता पांडे,सिद्धार्थ वाठोरे,तुषार कांबळे,उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री आवटे सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी संतोष आसोले व समस्त गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here