Home महाराष्ट्र सत्यशोधक समाज संघाचे दुसरे जिल्हा अधिवेशन कुऱ्हे पानाचे येथे उत्साहात संपन्न !….

सत्यशोधक समाज संघाचे दुसरे जिल्हा अधिवेशन कुऱ्हे पानाचे येथे उत्साहात संपन्न !….

177

🔸धरणगावातील सत्यशोधक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार !…..

🔹सत्यशोधक समाज संघाच्या जी.ए.उगले यांचे हस्ते ध्वजारोहण !…

🔸सत्यशोधक समाज संघाच्या आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते दिनदर्शिकेचे उद्घाटन !….

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.12डिसेंबर):- धरणगाव शहरातील सत्यशोधकांनी भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावी सत्यशोधक समाज संघाचे दुसरे जिल्हा अधिवेशनाचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. या अधिवेशनाचे प्रास्ताविक सत्यशोधक सुधाकर बडगुजर यांनी केले. सत्यशोधक समाज संघाची भूमिका अरविंद खैरनार यांनी मांडतांना महाराष्ट्रातील सत्यशोधकांच्या इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. यानंतर अनेक लोकं सध्या महाराष्ट्रात महापुरुषांचा अवमान करीत आहे त्यांचा निषेध सर्वांमध्ये करण्यात आला.

सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा अधिवेशनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदराव सपकाळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषदादा चौधरी होते. प्रमुख अतिथी मराठा विद्या प्रसारक समाज सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे, ओबीसी महिला साहित्य संमेलन अध्यक्ष विजयाताई मारोतकर, पुणे येथील उद्योजक किरण इंगोले होते. विशेष निमंत्रित सदस्य डॉ.प्रवीण वाघ, भीमराव खलाणे, चंद्रकांत चौधरी, मोरसिंग खंडू राठोड, सतीश पाटील, डी.पी.साळुंखे, अनिल पाटील, बाबुराव अण्णा घोंगडे, अनिल शिसोदे, जितेंद्र महाजन, डॉ.भी.ना.पाटील, किशोर वसंतराव पाटील, हाफिज फिरोज पिंजारी, सुनील पंढरीनाथ चौधरी व भरत शिरसाठ होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले, यानंतर खंडेरायाची तळी भरून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या परिस्थितीत सत्यशोधक झेंडा व सत्यशोधक दिनदर्शिकेचे ( सन २०२३ ) मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळ या संदर्भात प्रमुख वक्ते सत्यशोधक जी.ए. उगले यांनी सत्यशोधकांचा इतिहास मांडला. सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक दुसरे वक्ते प्रा.विश्वासराव पाटील यांनी भारतातील शेतकऱ्यांबाबत सत्यशोधक चळवळीची भूमिका मांडली. यानंतर सत्यशोधक समाज संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेश झाल्टे यांनी सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्रात काम करत आहे. आपले संस्कृती आपले सभ्यता राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे विचार आपल्याला तारतील या सोबतच सत्यशोधक समाज संघाचा इतिहास विस्तृत स्वरूपात मांडला. यानंतर कुऱ्हे गावाचे सरपंच प्रमोद उंबरकर यांनी ठरावाचे वाचन केले.

या अधिवेशनाचे साक्षीदार लहान माळीवाडा माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, संचालक भटुलाल महाजन, माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील, दयाराम महाजन, रघुनाथ महाजन, साहित्यिक तथा कवी प्रा.मिलिंद बागुल, आबासाहेब राजेंद्र वाघ, एच.डी.माळी, पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील, किशोर पवार, गोरख देशमुख, सुधाकर मोरे, दिनेश भदाणे, प्रफुल्ल पवार, विक्रम पाटील, तुषार पाटील होते. या अधिवेशनाला धरणगाव सत्यशोधक समाज संघ युनिट कडून ७,१०० रु. सहयोग निधी आयोजक प्रमोद उंबरकर, सुधाकर बडगुजर यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद सपकाळे, प्रमोद पाटील सर तर आभार एच.डी.माळी यांनी मानले. सत्यशोधक समाज संघ जिल्हा अधिवेशन यशस्वीतेसाठी सर्व कुऱ्हे पानाचे गावातील तसेच सर्व जळगांव जिल्हयातील सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांनी सहकार्य केले.

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here