Home महाराष्ट्र मोर्शी वरूड शेघाट शहरातील विद्युत वाहिन्या भूमिगत होणार !

मोर्शी वरूड शेघाट शहरातील विद्युत वाहिन्या भूमिगत होणार !

170

🔹डोंगर यावली, करजगाव, उदापुर, पिंपळखुटा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र पूर्णत्वास जाणार !

🔸आमदार देवेंद्र भुयार यांनी उपलब्ध करून दिला १३३ कोटी २५ लक्ष रुपयांच्या निधीला मंजूरी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.12डिसेंबर):-विधानसभा मतदार संघात मोर्शी, वरुड, शेंदुरजनाघाट तिन नगर परिषद आहेत. सदर नगर परिषद हद्दीत असलेल्या विद्युत खांबावरुन तारेच्या सहाय्याने विद्युत पुरवठा करण्यात येत आहेत. परंतू अवकाळी किंवा वादळी वाऱ्यामुळे तारांचे एकमेकाशी घर्षण होऊन त्यापासुन आग निर्माण होवुन शहरात आग लागण्याची किंवा हाणी होण्याचे प्रसंग थाबंविणे यासाठी तातडीने उपाय योजना करण्यासाठी मोर्शी वरूड शेंदूरजनाघाट शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी या तिनही नगर परिषद हद्दीतील विद्युत पुरवठा विजेच्या खांबावरुन ताराचे सहाय्याने विद्युत पुरवठा करण्या ऐवजी भुमीगत विद्युत पुरवठा करण्यासाठी मोर्शी वरूड तालुक्यातील डोंगर यावली,करजगाव, उदापुर आणि पिंपळखुटा या गावांना ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) इत्यादी ठिकानी नविन कामे प्रस्तावित करणेसाठी राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यशस्वी पाठपुरावा करून १३३ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

मोर्शी तालुक्यातील डोंगर यावली, करजगाव, उदापुर आणि पिंपळखुटा इत्यादी ठिकानी नविन उपकेंद्र प्रस्तावित करणेसाठी तसेच वरूड, मोर्शी, शेंदुरजनाघाट नगर परिषद हद्दीतील विजेच्या तारा जमिनीचे आतुन (भुमिगत) करणे, मोर्शी वरूड तालुक्यातील डोंगर यावली, करजगाव, उदापुर,पिंपळखुटा या गावांना ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) मंजूर केल्यामुळे या गावातील शेतकर्‍यांना सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. या उपकेंद्रांच्या उभारणीसाठी तब्बल ८ कोटी ३२ लाख रूपयांचा खर्च येणार असून लवकरच या उपकेंद्रांच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, तसेच वरूड मोर्शी व शेंदुरजनाघाट नगर परिषद हद्दीतील उपरीतारमार्ग वाहिण्या भुमिगत करणे या कामांकरिता एकुण अंदाजीत खर्च १२४ कोटी ९२ लक्ष रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

याबाबत बोलताना आमदार देवेंद्र भुयार म्हणाले राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना मोर्शी वरूड तालुक्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांच्याकडे सातत्याने बैठका घेऊन त्यांच्या निदर्शनास मोर्शी वरूड तालुक्यातील विजेच्या प्रश्नाची दाहकता आणून दिली होती. वरूड मोर्शी व शेंदुरजनाघाट नगर परिषद हद्दीतील उपरीतारमार्ग वाहिण्या भुमिगत करणे, मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीपंपांसाठी व घरगुती वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी डोंगर यावली, करजगाव, उदापुर आणि पिंपळखुटा परिसरातील ग्रामस्थ शेतकर्‍यांची विद्युत उपकेंद्राची मागणी रेटून धरली होती.

मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकरी मोठ्या कष्टाने शेती पिके घेत असतो, मात्र नियमित विजबिल भरूनही शेतीसाठी वेळेवर वीज मिळत नसल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देता येत नाही. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पाण्यावर अवलंबून असलेली पिके सुकू लागतात. शिवारासह गावांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. मोर्शी वरूड तालुक्यातील वीजेबाबतच्या एकूणच या सर्व बाबी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी
वरूड मोर्शी व शेंदुरजनाघाट नगर परिषद हद्दीतील उपरीतारमार्ग वाहिण्या भुमिगत करणे तसेच डोंगर यावली, करजगाव, उदापुर, पिंपळखुटा या गावातील विद्युत उपकेंद्रांचा समावेश करून घेण्याबाबत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तसेच महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांना आदेश दिले होते. त्यामुळेच या उपकेंद्रांना आता मान्यता मिळाली आहे. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून. भूमिगत विद्युत वाहिन्या, नवीन उपकेंद्र मंजूर झाल्याने परिसरातील गावांचा विजेचा प्रश्न सुटणार असून प्रामुख्याने शेतकर्‍यांचा अधिक फायदा होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी :
( १) मोर्शी, वरूड, शेंदुरजनाघाट नगर परिषद हद्दीतील उपरीतारमार्ग वाहिण्या भुमिगत करण्याकरिता — १२४ कोटी ९२ लक्ष रूपये.
२) ३३/११ के.व्ही. डोंगरयावली उपकेंद्र, — २ कोटी ८ लक्ष ४०१ रूपये.
३) ३३/११ के. व्ही. उदापुर उपकेंद्र, — २ कोटी ८ लक्ष ४०१ रूपये.
४) ३३/११ के. व्ही. करजगांव (मांगरूळी) उपकेंद्र, — २ कोटी ८ लक्ष ४०१ रूपये.
५) ३३/११ के.व्ही. पिंपळखुठा (निंभी) उपकेंद्र, — २ कोटी ८ लक्ष ४०१ रूपये.
या सर्व कामांकरिता मंजूर झालेला निधी १३३ कोटी २५ लक्ष ६०४ रूपये.)

मोर्शी वरूड तालुक्यातील वीज, पाणी, रस्ते व आरोग्य यांसह विविध प्रश्नांसाठी मी स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मोर्शी वरूड तालुक्यातील डोंगर यावली, करजगाव, उदापुर आणि पिंपळखुटा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राना तसेच वरूड मोर्शी व शेंदुरजनाघाट शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी नगर परिषद हद्दीतील उपरीतारमार्ग वाहिण्या भुमिगत करण्याकरिता महविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी १३३ कोटी २५ लक्ष रुपयांच्या कामांना मान्यता मिळऊन दिली असून निविदा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आता निविदा प्रक्रियेचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लागला. — देवेंद्र भुयार आमदार मोर्शी विधानसभा .

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here