Home महाराष्ट्र पत्रकारांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाही : डी. टी. आंबेगावे

पत्रकारांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाही : डी. टी. आंबेगावे

161

🔹पत्रकारांच्या एकजुटीचा विजय

✒️पिंपरी चिंचवड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पिंपरी चिंचवड(दि.12डिसेंबर):- पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली या घटनेची न्यूज 18 लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांनी बातमी कव्हर केली म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पत्रकार गोविंद वाकडे यांच्या अटकेचा निषेध करून त्यांना तात्काळ मुक्त करावे यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि इतर पत्रकार संघटना आंदोलन करण्याच्या पावित्र्यात होत्या.

आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. पत्रकार संघटनांचा विजय झाल्याचे चित्र आहे आणि यामध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा सहभाग असने हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची ताकद आहे. शिवाय अस्तित्वही असे पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे यांनी सांगितले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सर व पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी यांचे मनापासून आभार! कारण पत्रकारावर विनाकारण झालेला अन्याय कदापीही सहन केला जाणार नसल्याचे डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले आहे.

नो हार, ओन्ली जीत!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here