Home लाइफस्टाइल राज्य क्रीडा स्पर्धा करीताचिमूरचे मूकबधिर विद्यार्थी-चंद्रपूर येथील स्पर्धेत मिळविले सिल्वर मेडल

राज्य क्रीडा स्पर्धा करीताचिमूरचे मूकबधिर विद्यार्थी-चंद्रपूर येथील स्पर्धेत मिळविले सिल्वर मेडल

185

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.11डिसेंबर):-चंद्रपूर येथे झालेल्या दिव्यांग क्रीडा स्पर्धेत चिमूरच्या मुकबधीर विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल प्राप्त करीत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा करीता स्थान मिळविले.समाज कल्याण जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत दिव्यांग दिन साजरा करण्याकरिता दींव्यांग विद्यार्थ्यांच्या विशेष शाळा तसेच कर्मशाला शाळेच्या क्रीडा स्पर्धां तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

यात राष्ट्रांत तुकडोजी मुक बधीर विद्यालय चिमूर या शाळेतील मनीकर्निका मनोज गायकवाड वर्ग आठ ते बारा वयोगटात लांब उडी आणि ५० मिटर धावण्याच्या रेसिंग मधे दुसरे स्थान प्राप्त झाले, त्याकरिता लांब उडी आणि धावण्याच्या रेसिंग करीता सिल्वर मेडल ने सन्मानित करण्यात आले.

नयन माणिक शेंडे यांनी पण आठ ते बारा वयोगटात लांब उडी मधे प्रावीण्य प्राप्त करीत सिल्वर मेडल प्राप्त केले, राष्ट्रांत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालय चिमूरचे मनीकर्निका मनोज गायकवाड व नयन माणिक शेंडे यांची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे करीता झाली आहे,यांचे सर्व श्रेय मुख्याध्यापक रामदास कामडी, शिक्षक धर्मदास पानसे, भूपेंद्र गरमडे, शिक्षिका श्रुती मुन, तसेच उद्धव खोब्रागडे, ताराचंद बोरंकुटे, अशोक विभुते, पटवारी कोहपरे, राजू बनसोड, दिलीप उरकुडे, दिलीप चौधरी, चंद्रभागा वांढरे, यांना दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here