Home महाराष्ट्र गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्याची विभागीय स्तरावर निवड

गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्याची विभागीय स्तरावर निवड

178

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि11डिसेंबर):-.क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या द्वारा आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत गुरुकुल कॉन्व्हेंट, श्रीरामपूर ,पुसदच्या विद्यार्थ्यांनी मैदान गाजवले. व त्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा ९ डिसेंबर २०२२ रोजी यवतमाळ येथे जिल्हा क्रीडा संकुल मध्ये पार पडली .

यामध्ये गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षे वयोगटात तिहेरी उडी मध्ये हृषिकेश दशरथकर याने प्रथम क्रमांक पटकावला , तर ३हजार मीटर रनिंग मध्ये माहेश्वरी नाळे या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक पटकावला व चारशे मीटर रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला, आणि भालाफेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला ,आर्या जाधव या विद्यार्थिनीने ३ हजार मिटर वॉकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. व त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

शाळेचे क्रीडा मार्गदर्शक विक्रमसिंह राठोड यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले. शाळेचे संचालक कृष्णराव चापके व धनंजय चापके, मुख्याध्यापिका दीक्षा रणवीर मॅडम, क्रीडा मार्गदर्शक विक्रमसिंह राठोड व संस्थेचे सदस्य, सर्व शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here