Home चंद्रपूर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडा मारो आंदोलन

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडा मारो आंदोलन

231

✒️पंकज रामटेके( विशेष प्रतिनिधी)

घुग्घूस(दि.11डिसेंबर):- भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा काढल्या असा थोर महापुरुषांचा अपमान करणारा वक्तव्य केल्याने संपुर्ण संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे निरदर्शने करुन चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेस जोडे मारून चंद्रकांत पाटील मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांच्या वारसाने चालणारा आहेभाजप नेते हे सतत थोर पुरुषां विरोधात अपशब्द बोलून अहवेलना बहुजन समाजाचा अपमान करीत आहेयापुढे महाराष्ट्र हा थोर पुरुषांचा अपमान कदापी सहन करणार थोर पुरुषांचे अपमान करणाऱ्याना चंद्रपूरच्या पावन भूमीवर पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका काँग्रेस नेते राजूरेड्डी यांनी घेतली आहे

याप्रसंगी किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, महिला नेत्या सौ. संगीता बोबडे, सौ. सरस्वतीताई पाटील, श्रीमती दुर्गाताई पाटील, श्रीमती संध्याताई मंडल,सौ. मंगला बुरांडे, तिरुपती महाकाली,रोशन दंतलवार, अलीम शेख, विशाल मादर,अनुप भंडारी, विजय माटला,सुकुमार गुंडेटी,लखन हिकरे,शेख शमीउद्दीन, बालकिशन कुळसंगे,दिपक कांबळे,अरविंद चहांदे, दिपक पेंदोर,देव भंडारी,साहिल सैय्यद,शहजाद शेख, सुनील पाटील,कपिल गोगला,हरिश कांबळे,अमित सावरकर,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे, ताजु शेख,विजय आकापका,लक्ष्मण महेशकर,याकूब खान,चिरंजीव मेडशेल्ली, सन्नी कुममरवार,व मोठ्या संख्येने पदाधिकारी सदस्यगण उपस्थित होते.

समृद्धी महामार्ग- महाराष्ट्राची स्वप्नपूर्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here