Home महाराष्ट्र गौसे आजम सेवाभावी संस्था यांची नगर मधे 10 रु चे नाणी न...

गौसे आजम सेवाभावी संस्था यांची नगर मधे 10 रु चे नाणी न घेणारे दुकानदार वर करवाईची मागणी

195

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाड़ा(दि.9डिसेंबर):-मा.ना. राधाकृष्ण विखे पा., साहेब, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना पत्र द्वारे निवेदन देण्यात आले की अहमदनगर शहर व जिल्हयातील काही शहरांमध्ये १०/- रुपयाचे नाणे स्विकारण्यास मनाई करत असलेने संबंधित व्यापा-यांवर तसेच बँकांवर कायदेशिर कारवाई व्हावी यासाठी गौसेआजम सेवाभावी संस्थाचे संस्थापक मुख़्तार सय्यद व अध्यक्ष सुल्तान शेख यांनी सांगितले की सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी असून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सतत प्रयत्नशिल असतो. अहमदनगर शहर तसेच जिल्हयातील काही शहरांमध्ये १०/- रुपयांचे नाणे व्यापारी वर्ग स्विकारीत नसल्याचा प्रकार चालू आहे.

जिल्हयातील तसेच परजिल्हयातील अनेक नागरीक कामानिमित्ताने या शहरांमध्ये येतात परंतु त्यांच्याकडून १० रुपयांचे नाणे व्यापारी स्विकारीत नसल्याने ग्राहकांची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. या व्यापा-यांकडे याची विचारणा केली असता ते सांगतात की बँकेत 10 रुपयाचे नाणे आमचेकडून स्विकारत नाही त्यामुळे आम्ही तुमच्याकडून १० रुपयांचे नाणे घेणार नाही अशा प्रकारे ग्राहकांची मोठी अडवणूक केली जात आहे.

वास्तविक पाहता १० रुपयांचे नाणे हे रिझई बँकेने वितरीत केलेले आहे तसेच ते भारतीय चलन असून या चलनाचा अवमान हे व्यापारी तसेच बँका करीत आहेत १० रुपयांचे नाणे हे भारतीय अर्थव्यवस्थेत नियमित चालणारे चलन आहे हे चलन भारतीय बाजारपेठेत चालू असतांना मात्र नगर शहर व जिल्हयातील काही शहरातील व्यापारी व बँका १० रु.चे चलन स्विकारण्यास स्पष्ट शब्दात नकार देत आहेत. तरी आपण नगर शहर व जिल्हयातील ज्या ज्या शहरात १० रु. चे नाणे स्विकारण्यास नकार देवून ग्राहकांची अडवणूक केली जाते अशा सर्व व्यापारी तसेच बँकांची सखोल चौकशी करून त्यांचेविरुध्द योग्य ती कायदेशिर कारवाई करणेबाबत संबंधितांना आदेश करावेत तसेच यापुढे या सर्व व्यापारी व बँकांना १० रु. चे नाणे स्विकारण्याबाबत सक्ती करण्यात यावी ही आपणास नम्र विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here