✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.8डिसेंबर):-अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, महागाई असे अनेक समस्या सामान्य नागरिकांना जीवन जगताना भेडसावत आहेत. केवळ परस्परात चर्चा करण्यापेक्षा संघटीत हो यावर उपाययोजना व शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करता येईल का ? यावर कृती आराखडा उद्देशाने चिमुरात दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता लुम्बीनी बौद्ध विहार लुम्बीनी नगार,वडाळा (पै.) येथे “सामाजिक समस्या व एकतेची आवश्यकता” या विषयावर सभेचे आयोजन कल आहे.
या सभेला चिमुर नगर परिषद कार्यक्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकत्यांनी आपल्या सहकारी मित्रांसह उपस्थित राहावे. ही आयोजकांची अपेक्षा आहे. या सभेत कार्यकर्त्यांच्या कार्यक्षेत्रातील सामाजिक समस्या व त्यावर उपाययोजना, लोकसहभाग, आंदोलनाची भूमिका आदी विविध विषयावर चर्चा करण्याचा मानस आहे.
या सभेच्या आयोजनाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा वडाळा (पै. ) यांनी स्विकारली आहे. सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन नारायण कांबळे, गुलाब गणवीर, शालीक थुल, जनार्धन खोब्रागडे, शिवराम मेश्राम, वासुदेव गायकवाड, मनोज राऊत, श्रीदास राऊत, भाग्यवान नंदेश्वर, आकाश भगत, विनोद सोरदे, प्रविण गजभिये, मधुकर राऊत, किशोर जांभुळकर आदीने केले आहे.