✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 7 डिसेंबर):-क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जालना येथील ‘100 शिक्षक क्लब आॕफ जालना’ च्या वतीने दिनांक 4 डिसेंबर 2022 ला जे . ई . एस . महाविद्यालय जालना येथे पुरस्कार सोहळा पार पडला . यात महाराष्ट्रातील 28 कर्तबगार शिक्षक व शिक्षिकांना ‘ शिक्षक सेवा गौरव’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करण्यात आला .
यामध्ये नागभीड पंचायत समिती अंतर्गत जि . प . उच्च प्राथ . शाळा पारडी ( ठवरे ) येथील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री . सुनिल रूषीजी हटवार यांचा शाल , फेटा , प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला . कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाजसेवक तथा प्रसिध्द उद्योगपती मा . सुनिलजी रायगट्टा तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मा . अंजली धानोरकर , उपजिल्हाधिकारी , औरंगाबाद ह्या उपस्थित होत्या .
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मंगला धुपे , शिक्षणाधिकारी जालना , डायट जालना चे प्राचार्य मा . विजयकुमार शिंदे , डॉ . सतिश सातव शिक्षण उपनिरीक्षक , प्राचार्य डॉ . शिवनारायण बजाज , डॉ . दत्तात्रय गाडे व उदय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील 28 शिक्षकांचा व 5 आदर्श शाळांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
यात 14 शिक्षक जिल्हा परिषदेचे व 14 शिक्षक खाजगी शिक्षण संस्थेतून निवडण्यात आले होते . हा शिक्षक सेवा गौरव सोहळा म्हणजे शिक्षकांनीच आपल्या कर्तबगार शिक्षकांचा केलेला सत्कार होय असे प्रतिपादन प्रमुख अतिथींनी केला . श्री . सुनिल हटवार यांचा ‘शिक्षक सेवा गौरव ‘ पुरस्काराने सन्मान झाल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .




