Home Breaking News वडाच्या झाडाजवळ कोयत्याने वार करून केले गंभीर

वडाच्या झाडाजवळ कोयत्याने वार करून केले गंभीर

389

🔸जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी जीवघेणी प्राणघातक हल्ला

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.6डिसेंबर):- येथील नावाजलेल्या फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या परिसरातील वडाच्या झाडाजवळ जुन्या वादाचा वजपा काढण्यासाठी दि.५ डिसेंबर २०२२ रोजीच्या सकाळी ११ वाजताच्या दरम्यान कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये तुकाराम बापू वार्डात राहणाऱ्या दोघांना विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अश्विन देवसिंग पवार वय ३० वर्षे रा.वसंत नगर असे तक्रारदार जखमीचे नाव आहे.तर तुषार बालकिसन ताटेला वय २० व त्याच्या एका साथीदारा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आश्विन हा फुलसिंग नाईक महाविद्यालयातील वडाच्या झाडाजवळ असल्याची माहिती तुषार व त्याच्या एकासाथिदाराला मिळाली.

त्या माहितीच्या आधारे दोघांनी संगणमत करून जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी वाद निर्माण केला. त्यानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ करून कोयत्याने डाव्या हातावर मारून गंभीर जखमी केले.सोबतच जीवने मारण्याची धमकी दिली.घाबरलेल्या तरुणाने जखमी अवस्थेत वसंत नगर पोलीस स्टेशन गाठून दोघाजणा विरोधात तक्रार दिली असता विविध कलमाने गुन्हे दाखल केले आहे. प्रकरणाचा अधिक तपास वसंत नगर पोलीस स्टेशनकडून सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here