Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न

139

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6 डिसेंबर):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे होते. शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गो. वा. कॉलेज, नागभीड येथील मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अनमोल शेंडे आणि प्रमुख अतिथी म्हणुन राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते प्रा. नानाजी रामटेके, आरमोरी विचारमंचावर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. देवेश कांबळे यांनी आधुनिक भारताच्या पुनर्बांधणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान याविषयी सविस्तर विवेचन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. अनमोल शेंडे यांनी ” ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” या विषयावर भाष्य करतांना आजचा दिवस हा बाबासाहेबांना नुसते स्मरण करण्याचा नाही तर बाबासाहेबांच्या विचारांना आचारात आणण्यासाठी आत्मचिंतन करण्याचा दिवस आहे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. नानाजी मेश्राम यांनी ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार आणि कार्य ” या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यानी आयुष्यात मोठे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार प्रा. माला कांबळे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, एन. सि. सि. कॅडेट, प्राध्यापकवृंद आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here