Home महाराष्ट्र नेवजबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे मतदार नोंदणी जागृती अभियान

नेवजबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे मतदार नोंदणी जागृती अभियान

164

🔹तहसिल कार्यालय,राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6 डिसेंबर):-राष्ट्रीय मतदार नोंदणी जागृती अभियान निमित्त नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे आज स्व.हिरालालजी भैया सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 18 वर्ष वयोगट पूर्ण करणारे विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी तहसिल कार्यालय ब्रम्हपुरी येथिल मा विजय सयाम नायब तहसीलदार निवडणूक विभाग , श्री राऊत निवडणूक विभाग, डॉ प्रकाश वट्टी,प्रा वर्षा चंदनशिवे , प्रा रुपेश वाकोडीकर, प्रा. अभिमन्यू पवार, डॉ विवेक नागभिडकर व प्रा अजय खोब्रागडे हे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रकाश वट्टी यांनी मतदान करणे हे आदर्श नागरिकाचे मूलभूत कर्तव्ये आहे.त्याकरिता मतदार नोंदणी करणे व मतदान प्रक्रियेत सहभागी होणे याचे महत्त्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पटवून देताना कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागिल ध्येय व उद्दिष्टे पटवून दिले. तर विजय सयाम नायब तहसीलदार यांनी मतदान नोंदणी कशी करायची आहे .

हे अगदी सोप्या भाषेत पटवून आँनलाईन आणि आँफलाईन दोन्ही पध्दतीने अर्ज करता येतो त्याकरिता कोणते कागदोपत्री पुरावे जोडावे व अर्ज करण्याची पद्धत समजावून सांगितले. आणि 200 अर्ज मतदान नोंदणी चे भरून घेतले या कार्यक्रमाचे आभार प्रा वर्षा चंदनशिवे यांनी मानले तर संचालन डॉ प्रकाश वट्टी यांनी केले सदर कार्यक्रम हे प्राचार्य डॉ डी एच गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा आनंद भोयर,तथा माजी रासेयो स्वयंसेवक गोपाल करंबे, सुरज के. मेश्राम, रासेयो स्वयंसेवक गणेश धंजूळे, कुणाल नैताम, रोहित सहारे, सौरभ तलमले, रूचिता येलमुले, मयुरी ठेंगरी, राणी गेटकर, श्रुती करंडे, गायत्री मदनकर, मीनाक्षी गुरनुले, संजना शेंदरे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here