Home महाराष्ट्र हा महापरिनिर्वाण दिन संकल्प दिन झाला पाहिजे!

हा महापरिनिर्वाण दिन संकल्प दिन झाला पाहिजे!

145

सहा डिसेंबर 1956 ला महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे हा दिवस भारतीय इतिहासात अतिशय दुःखद दिवस म्हणून गणल्या जाते त्यादिवशी अखिल मानव समाजाला मानवतेचे दर्शन घडविणारा आणि भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वयंप्रकाशित व्हा( फक्त दीप भव) या तथागत गौतम बुद्धाच्या उपदेशाचे दीपस्तंभा प्रमाणे अभंग आवाहन करणाऱ्या युगपुरुषाच्या संघर्षमय जीवनाची ती संध्याकाळी म्हणावी लागेल त्या अपरात्रीने मानव समाजाच्या डोक्यावरील छत्रच हीसकावले आहे हे वास्तवातील बिकट दुःख सर्व सहृदयता असणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या हृदयाला आज तागायत निबर झालेली जखम म्हणून सतावत आहे हे कोणीही नाकरू शकत नाही परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हयात असतानाच तथागत बुद्धाच्या जन्म मृत्यूच्या प्रवचनातील जे निर्माण होते ते नष्ट होते या सृष्टीच्या नियमाला अंगीकारून एक अत्यंत मोलाचे कार्य करण्यास आम्हास सांगितले आहे ते कार्य म्हणजे माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा मी सांगतो त्या गोष्टी जिव्हाळ्यांने करा अर्थात सहा डिसेंबर या दिवसाला संकल्प दिवस ठरविण्याचे कार्य आहे असे व्यक्तीगत माझे मत आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास विद्यार्थी व राजकारण या टॉपिक मध्ये त्यांचे भाषण संपण्यापूर्वी बाबासाहेब सांगतात की शेवटी मला आपणास एवढेच सांगायचे आहे की जर आपण एकजुटीने वागाल तर काहीतरी करू शकाल. पुढे ते म्हणतात आपल्या समाजावर हजारो वर्षापासून होत असलेला जोरजुलुम व अन्याय निवारण्याचे कार्य आजच्या पिढीने स्वखुशीने आपल्या शिरावर घ्यावयास हवे आहे आपल्या समाजात ऐक्याची अत्यंत जरुरी आहे व ऐक्यामुळेच आपण हे कार्य करू शकू अशी माझी खात्री आहे आणखी पुढे जाऊन असे म्हणतात की याबाबतीत शिस्त अत्यंत कठोरपणे पाळली तरच काहीतरी होऊ शकेल नाही तर सर्वत्र बजबजपुरी माजून समाज नाश व नि:संघटना होईल तरी अशावेळी योग्य ती खबरदारी सर्वांनी घ्यावी आणि अगदी भाषण समाप्त करताना शेवटी आपल्यात संघटना, शील व शिस्त वाढवा व समाज उन्नतीस त्याचा फायदा द्या!

एवढे सांगून आपली रजा घेतो! हे उद्गार आहेत आमच्या आजच्या नव्या पिढीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तेव्हा आज आपण आत्मचिंतन करून स्वतःला जर या संदर्भात प्रश्न विचारला की आपण तसे वागतो का? तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल असे मला वाटते कारण सध्याची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभी केलेली आंबेडकरी राजकीय चळवळ समजून घ्यायला महाराष्ट्रातील आपल्या ज्ञाती बांधवांना चाळीस वर्षे लागलीत आणि त्यातही ज. गायकवाड सारखी अभद्रवृत्ती आज परत तोंड वर काढत असेल तर याला काय म्हणावे? म्हणून आपण सर्व समाजाने व समाजातील विचारवंतांनी ,सुज्ञ नागरिकांनी वेळीच जागृत होऊन सहा डिसेंबर या दिवशी एक नवा संकल्प केला पाहिजे की ज्याप्रमाणे आम्ही 22 प्रतिज्ञांचे पालन करू असा डॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत आपल्या वाढ वडिलांनी संकल्प पूर्ण करून दाखविला आहे त्याचाच परिपाक की आज आम्ही गाडी माडी आणि आम रोडवर सोन्यासारखी भीमवाडी उभी करीत आहोत या सर्व बाबी आम्ही आज या सहा डिसेंबर दिनाला टिकवून ठेवण्याचा संकल्प करीत आहोत असे जाहीर केले पाहिजे हा परत आमच्यासाठी संघर्षाचा भाग आहे हे लक्षात घ्या आणि हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली ठरेल अन्यथा……..

जय भीम जय भारत

✒️जीवन बोदडे भांबेरी(मो.नं.9689268620)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here