Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात माजी शिक्षणमंत्री कै.मा. ना. अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य...

चोपडा महाविद्यालयात माजी शिक्षणमंत्री कै.मा. ना. अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

218

✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चोपडा(दि.5डिसेंबर):- येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी शिक्षण मंडळ परिवार आणि रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कै.मा.ना.अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘भव्य रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या रक्तदान शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य अधिकारी सौ.रक्षिता प्रसाद पाटील, सौ.माधवी अनिल वानखेडे, सौ.अलका नंदकिशोर पाटील, सौ.सुरेखा माधवराव पाटील, सौ.लीना विपुल छाजेड, सौ.नूतन दिलीप पाटील, सौ.संगीता संतोष अहिरे, मेमोसा हायस्कूल चोपडाच्या सेक्रेटरी सौ.नीलम स्टीफन सपकाळे, सौ.संध्या संदेश जैन, रजिमाबी आरिफ शेख, सौ.मीना प्रकाश सोमानी, मेमोसा हायस्कूलच्या प्राचार्य सौ.विरोनिका तुषार सूर्यवंशी, प्रा.सौ.माया टी.शिंदे, ऑक्सफर्ड स्कूल चोपडाच्या प्राचार्य सौ.ममता कपिल ज्ञाती, नर्सिंग कॉलेजच्या प्रमुख सौ.करुणा चंदनशिव आदि मान्यवर उपस्थित होते.

या रक्तदान शिबीरात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, बीबीए, बीसीए विभागातील तसेच महाविद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.याप्रसंगी एकूण ६० विद्यार्थी तसेच २० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी असे एकूण ८० जणांनी रक्तदान केले.

या शिबिरात महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी रक्तदात्यांना प्रोत्साहन देतांना ते म्हणाले की, ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान हे हितकारक असून दुसऱ्यास जीवदान देण्याइतके महत्वपूर्ण सामाजिक कार्य आहे. आपण रक्तदानासारखे अनमोल कार्य करीत आहेत ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे’ या शब्दांत रक्तदात्यांचे कौतुक केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याविषयी प्रोत्साहन देऊन रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेतील सर्व विद्या शाखांचे उपप्राचार्य व प्राचार्य यांनी या रक्तदान शिबीराप्रसंगी सदिच्छा भेट दिली.

या रक्तदान शिबीरात श्रीमती.शरच्चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय, दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील नर्सिंग महाविद्यालय, श्रीमती. शरच्चंद्रिका सुरेश पाटील फार्मसी तसेच कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कृती अंगीकृत करणारा भारत घडवूया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here