Home महाराष्ट्र पारोळासह तालुक्यात सत्यशोधक समाज संघ अधिवेशनाचा जोरदार प्रचार

पारोळासह तालुक्यात सत्यशोधक समाज संघ अधिवेशनाचा जोरदार प्रचार

113

🔸खान्देशातील सत्यशोधकांचा इतिहास आपल्यासाठी ऊर्जा स्रोत – अरविंद खैरनार

🔹सत्यशोधकांचे विचार प्रेरणादायी – विजय लुल्हे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.5डिसेंबर):-पारोळ्यासह तालुक्यात सत्यशोधक समाज संघाचे २ रे जिल्हा अधिवेशन भुसावळ तालुक्यातील पानाचे कुऱ्हे येथे रविवार दि. ११ डिसेंबर, २०२२ रोजी आयोजित केले आहे त्याच्या प्रचार व प्रसारार्थ पारोळासह तालुक्यात जोरदार प्रचार करण्यात आला. सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांनी पारोळा येथे श्री.व्यंकटेश स्पेअर पार्टस् व सर्व्हिस सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधकांचा इतिहास सांगून त्यांचे अद्वितीय योगदान सांगितले. अधिवेशनाची रुपरेषा विधी कर्ते भगवान रोकडे यांनी सांगितली.

अधिवेशन जिल्हा आयोजन समिती सदस्य विजय लुल्हे यांनी सत्यशोधक संघांतर्फे काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्ये, कृषि संस्कृतीतील सण व उत्सव तसेच माहेवार येणारी सत्यशोधकीय प्रेरणादायी दिनविशेष यांची माहिती दिली. याप्रसंगी क्षत्रिय माळी समाज अध्यक्ष संजय महाजन, कार्याध्यक्ष कैलास महाजन व धीरज महाजन यांनी माळी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नती संदर्भात सांगोपांग चर्चा केली .

बहुसंख्येने अधिवेशनास उपस्थित नोंदवू असे आश्वासन धीरज महाजन यांनी दिले.जिल्हा आयोजन समिती सदस्य शिवदास महाजन यांनी अधिवेशनाची रुपरेषा सांगितली . यानंतर तामसवाडी येथे आदर्श शेतकरी पुरस्कृत सुभाषराव लोखंडे, जितेंद्र कोळी तसेच मोंढाळे पिंप्री येथे निवृत्त माध्यमिक शिक्षक भिकन बाविस्कर यांना भेटून अधिवेशनाची ध्येय धोरणे व कार्यवाही बाबत चर्चा खैरनार यांनी केली यावेळी निवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत जगदाळे व लिंगायत सर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विधिकर्ते शिवदास महाजन यांनी केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कृती अंगीकृत करणारा भारत घडवूया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here