
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.5डिसेंबर):-शेतकऱ्यांना सुरु असणारे कृषी विषयक नव नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्ह्यात शेतकरी अभ्यास दौरे आयोजित करुन मोर्शी वरूड तिवसा चांदूरबाजार तालुक्यातील ६० प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रशिक्षण संस्था, संशोधन संस्था, प्रगतीशील शेतकरी, शेती, प्रक्रिया उद्योग ठिकाणी भेटी आयोजित करून अभ्यास दौऱ्याकरिता पाठविण्यात आले त्यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी साजणा इंगळे, मंडळ कृषी अधिकारी म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, पाळा येथील सरपंच अजय राऊत, समीर विघे, अतुल काकडे यांच्याहस्ते वाहनाला हिरवी झेंडी दाखऊन शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याकरीता रवाना करण्यात आले
एकात्मीक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम अंतर्गत येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या मोर्शीच्या वतीने परंपरागत शेती पध्दतीला नाविण्यपूर्ण प्रयोग व संशोधनाची जोड दिली जावी या हेतुने ५ ते १० डिसेंबर या कालावधीचे मोर्शी, वरूड, तिवसा, चांदूबाजार येथील शेतकर्यांसाठी अभ्यास दौरा सहलीचे आयोजन करण्यात आले. अभ्यास दौर्यात शेतकर्यांनी विविध पीके, लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञान, बाजारपेठ आदिंविषयी माहिती शेतकरी जाणून घेणार आहे.
शेतीत आधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करणे राज्यातील विविध कृषी संशोधन केंद्र तसेच शेतीवर आधारीत उद्योगधंदे, प्रक्रिया केंद्र इत्यादींना भेटी देऊन माहिती मिळविणे. प्रत्यक्ष प्रात्याक्षिकांच्या माध्यमातुन जे नाविण्यपुर्ण उपक्रम राज्यामध्ये राबविले जाते त्यांची ओळख करून प्रत्येक शेतकर्यांनी तंत्रज्ञानाचा अंगीकार करुन शेतीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आर्थिक दृष्ट्या समृध्द व्हावे असे मत ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
येत्या काळात गटशेती व शेतकरी उत्पादक कंपण्या स्थापण करुन शेती करणे ही काळाची गरज आहे.
मोर्शी वरूड तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपण्या अधिकाधिक सक्षम होण्यासाठी विकेल ते पिकेल या धर्तीवर आधारीत सुक्ष्म प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी विभाग सदैव शेतकर्यांच्या पाठीशी राहील. काही निवडक शेतकरी यांना शेती व शेतीसी निगडीत कृषी व्यवसाय करण्याची ईच्छा आहे. असे शेतकरी एकत्र येवुन गटशेती किंवा कृषी आधारीत उद्योगधंदे स्थापण करण्याच्या दृष्टीने कृषी सहलीचे आयोजन करण्यात आल्याचे मोर्शी तालुका कृषी अधिकारी नीलिमा इंगळे यांनी यावेळी सांगितले.
मोर्शी वरूड तिवसा चांदूरबाजार येथील ६० शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले असून शेतकरी अभ्यास दौरा यशस्वीतेसाठी उप विभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी साजना इंगळे, क्षेत्रीय पातळीवर काम करणारे कर्मचारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी परिश्रम घेत आहे
