Home Education युवा गटाची मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न

युवा गटाची मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न

139

मार्जिन मनीची योजनेच्या उद्योगासाठी आवश्यकतेनुसार कर्ज देण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँकां तत्पर- जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एस.डी.सावंत .

हिंगोली-मार्जिन मनी योजनेच्या उद्योग साठी आवश्यकतेनुसार कर्ज देण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँका तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.डी.सावंत यांनी केले.सामाजिक न्याय व विशेष सहा विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 6 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत ॔समतापर्व ऺ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून समाज कल्याणचे आयुक्त शिवानंद मिरगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भावनांमध्ये युवा गटाची मार्जिन मनी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सावंत बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक एस. ए. कादरी होते कार्यक्रमात नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक आशिष पंत, जिल्हा अग्रणी बँकेचे एस. डी. सावंत ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेचे संचालक धनाजी बोईले आदी प्रमुख वक्तांनी नवीन उद्योग उभारणीसाठी उपस्थित नवं उद्योजकांना सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. ए.कादरी यांनी उद्योग नोंदणी व उद्योग उभारणी पर्यंतची संपूर्ण माहिती दिली तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांनी केले सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले. वसमत येथील उद्योजकता ट्रेनिंग घेऊन सुशील इंगोले यांनी किराणा व्यवसाय चालू केला. आशिष वाळवंटे यांनी मशरूम उत्पादन हा व्यवसाय चालू केला.

सौ.धम्मदीपा मुळे यांनी अभिराज भोजनालय हा व्यवसाय चालू केला. उमेश महा उमेश इंगोले यांनी मोबाईल रिपेरिंग सेंटर टाकले. सोनाली साबणे यांनी किराणा दुकान यांनी किराणा दुकान चालू केले. सुदर्शन श्रावण यांनी नरडे गुरुकुल पापड उद्योग हा व्यवसाय चालू केला. राहुल कांबळे यांनी आर के एजन्सी अँड बुक सेंटर हा व्यवसाय चालू केला .नीता कांबळे युअरचाॅईस सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्यूटर हा व्यवसाय चालू केले. तर आभार प्रदर्शन आत्माराम वागतकर यांनी केले कार्यशाळेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राज्यश्री शाहू महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .या कार्यशाळेसाठी दीडशे ते दोन युवक उपस्थित होत

राजकारणातील उघड जातीवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here