✒️चामोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चामोर्शी(दि.4डिसेंबर):- 8 जानेवारी 2023 ला इंदोर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या युवा प्रवासी भारतीय दिवस समारोहात राष्ट्रीय सेवा योजना तर्फे केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालय चामोर्शी येथे बीकॉम अंतिम वर्षात शिकणारा अरबाज मुस्तफा शेख याची निवड झाली आहेया कार्यक्रमात भारतातील प्रत्येक राज्यातून तीन मूले व तीन मुली विद्यार्थी स्वयंसेवकांची निवड होत असते या वर्षी महाराष्ट्र राज्यातून निवडलेल्या तीन विद्यार्थ्यांन मधून अरबाज शेख याची प्रथम स्थानी निवड झाली आहे .
प्रत्येक २ वर्षातून एकदा आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील NRI भारतातून बाहेर असून इतर देशात आपल्या अनमोल कामगिरी साठी सन्मानित करण्यात येतात हा दिवस ९ जानेवारी ला सादर करण्यात येतो. याच दिवशी १९१५ ला महात्मा गांधी साऊथ आफ्रिका वरून वर्णभेद या समस्या वर सुरू असलेल्या लढ्यात आपला मूल्यवान सहभाग देऊन भारतात परत आले होते.
या कार्यक्रमात अनेक अनिवासी भारतीय सहभागी होतील आणि त्यांच्या बरोबर नीवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यानं संवाद करायची संधी मिळणार आहे . या ३ दिवसीय कार्यक्रमात भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी, क्रीडा आणि युवा मंत्रालय प्रमुख अनुराग ठाकूर , भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर आणि मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह हे उपस्थित राहतील.
अशा प्रतिष्ठित अखिल भारतीय स्तरावरील कार्यक्रमासाठी चामोर्शी गावातील केवळरामजी हरडे महाविद्यालयात शिक्षण घेणारा अरबाज शेख याची निवड होणे ही आमच्या साठी अभिमानाची बाब आहे अशा शब्दांत संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे ,सचिव डॉ स्नेहा हरडे,प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर व कार्यक्रम अधिकारी डॉ पवन नाईक सर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.