Home महाराष्ट्र आठ”गिल्लो ऑन द गो “बालकांसाठी नाट्यप्रवास या आगळ्या, वेगळ्या कार्यक्रम संपन्न

आठ”गिल्लो ऑन द गो “बालकांसाठी नाट्यप्रवास या आगळ्या, वेगळ्या कार्यक्रम संपन्न

115

✒️विशेष प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि: १ डिसेंबर):- रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरुल येथे गिल्लो फाउंडेशन मुबंई व प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “गिल्लो ऑन द गो “बालकांसाठी नाट्यप्रवास या आगळ्या, वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर या कार्यक्रमाची, यातील नामवंत कलाकारांची आतुरता मुलांना लागून राहिली होती. जेव्हा या दिग्गज कलाकारांना घेऊन गाडी आमच्या शाळेत आली. तेव्हा मुलाच्या आनंदाला उधाण आलेले त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते.

गिल्लो ऑन द गो, यातील कलाकारांनी सादर केलेल्या कलेमुळे मुले अगदी आनंदी झाली. मुलामध्ये एक चैतन्याचे वातावरण तयार केले.मुलांनी सुद्धा त्यांच्याशी मुक्तपणे सवांद साधला. आजचा दिवस आमची ही चिमणी, पाखर नेहमी स्मरणात ठेवतील यात तिळमात्र शंका नाही.हा छानसा कार्यक्रम साजरा करून ग्रामीण भागातील मुलांच्या मनात कलेची बीज पेरण्यासाठी मेहनत घेणारे शैली सत्तू मॅम, मलिका मॅम, तुषार सर, जिग्ना मॅम, प्रीती मॅम, सागर सर, हरिओम सर, अल्मास मॅम, व संदीप सर या सर्व टिमचे शाळेचा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 इतर अनेक उपक्रम व कार्यक्रम ग्रामीण भागातील मुलासाठी राबवणारे प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष मा. यतीन शहा सर, सचिवा सुहासिनी शहा मॅडम यांचे खूप खूप आभार त्यांनी ही अनमोल संधी आम्हांला उपलब्ध करून दिली… तसेच प्रिसिजन फाउंडेशन चे माधव देशपांडे साहेब, अश्विनी मॅम व सर्व प्रिसिजन परिवाराचे कुरुल शाळा व शाळा व्यवस्थापन समिती या कार्यक्रमाचे आभार मधुकय कांबळे यांनी मांडले.यावेळी केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे, मुख्याध्यापक मंचुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुहास घोडके, शिक्षक सचिन शिंदे, समाधान गोवर्धनकर शिक्षिका लामतुरे,तोरखडे, सोनवणे आदींसह उपस्थित होते.

२९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आणि पितृभाषा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here