✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.1डिसेंबर):- चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या व मुख्यालयापासून येथे 125 किलोमीटर असलेला ब्रम्हपुरी शहर हे शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, शहर असून शहरात अनेक विद्यालय महाविद्यालय आहेत त्याच बरोबर टेक्निकल एज्युकेशन सुद्धा आहे तसेच आरोग्याची सुविधा असल्याने शहराबाहेरील जिल्ह्याबाहेरील अनेक विद्यार्थी व रुग्ण ब्रम्हपुरी ला जाणे येणे करीत असतात.शहरात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने चंद्रपूर मुख्यालय, नागपूर अमरावती गडचिरोली,अकोला, वणी यवतमाळ,पुसद गोंदिया भंडारा अहेरी सिरोंचा आदी ठिकाणी प्रवास करीत असतात.
ब्रम्हपुरी आगाराची स्थापना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या स्थापनेपासूनच झाली ते गडचिरोली विभागात येते .ब्रम्हपुरी आगारात सध्या 55 बसेस असून त्या कालबाह्य झालेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागतो.सदर अपुऱ्या बसेसमूळे बसफेऱ्या करण्यास अडचण निर्माण होत असल्याने प्रवाश्याची गैरसोय होत आहे. अनेक वर्षापासून या आगाराला नविन बसेस नसल्याने लांब पल्याचे मार्ग चालविण्यास सुध्दा अडचण येत आहे तर काही मार्ग बंद झालेले आहे. भंगार व नादूरुस्त बसेसमूळे मार्गातच बस बंद होण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत असल्याने एसटी महामंडळाच्या उत्पनावार विपरीत परिणात होत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष बाब म्हणजे ब्रह्मपुरी आगार याआधी महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचे उत्पन्न देणारे आगार होते. मात्र जुनाट व नादूरुस्त बसेस त्याचबरोबर बसेसची कमतरता इत्यादी कारणामूळे महामंडळाच्या उत्पन्नावर परीणाम झालेला आहे व सध्या बसेस अभावी लांब पल्ल्याच्या गाड्या आगार सोडू शकत नाही व मानव विकासच्या बसफेऱ्याना नादुरुस्त बसेस व बसेची अपूरी संख्या या मूळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन ब्रम्हपुरी आगारास नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे शहराध्यक्ष प्रशांत डांगे यांनी ब्रम्हपुरी आगार व्यवस्थापक नितीन झाडे यांचे मार्फत मान मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे निवेदन देताना नरेश रामटेके तालुका अध्यक्ष री. प. (खो), चक्रेश करंबे, मदन रामटेके,किशोर खापर्डे आदी उपस्थित होते.