Home महाराष्ट्र मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह येथे सामाजिक न्याय पर्व

मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह येथे सामाजिक न्याय पर्व

215

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.30नोव्हेंबर):-सामाजीक न्याय विभागा अंतर्गत सामाजिक न्याय पर्व २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ पर्यत आयोजन केले आहे. त्या अनुसंघाने शहरातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे सामाजिक न्याय पर्व अंतर्गत विवीध विषयावर मार्गदर्शनाचा कार्यकम घेन्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व वस्तीगृहाचे अध्यक्ष सुनिता खोब्रागडे, मार्गदर्शक ॲड संजिवणी सातारडे, चिमूर प्रेस चे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, मिरा काळे आदी उपस्थीत होते. ॲड सातारडे यांनी संविधान, कुडवे यांनी पत्रकारिता या विषयावर व कार्यक्रमाचे अध्यक्ष खोब्रागडे यांनी विवीध विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमा दरम्यान गोंडवाणा विद्यापीठ अंतर्गत आयोजीत ॲथेलेटिक्‍स स्पर्धेत संजना भिमराव ढोक हिने १०० मिटर हर्डल्स मध्ये व शुभागी मधूकर गिरी हिने २१ किमी स्लो वॉक रेस मध्ये बाँझ पदक पटकवाले, प्राविन्य प्राप्त विद्यार्थीनीचा सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सपना पाटील व आभार सोनल मुन विशेष सहकार्य बाह्य कर्मचारी सायली वनमाळी व विद्यार्थ्यांनी ने केले. भारतीय संविधानाच्या प्रास्तावीकांचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

राजकारणातील उघड जातीवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here