Home महाराष्ट्र पिछडा वर्ग ( OBC) मोर्चा ने पुकारलेला भारत बंदला चिमूर शहरात प्रतिसाद

पिछडा वर्ग ( OBC) मोर्चा ने पुकारलेला भारत बंदला चिमूर शहरात प्रतिसाद

231

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29नोव्हेंबर):-राष्ट्रीय पिछडा वर्ग ( OBC ) मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या आवाहनानुसार भारताच्या सर्व जिल्हा तालुक्याच्या महत्वाचे शहरा प्रमाणे चिमूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला अभिवादन, हारार्पण करून नारे देत देत बाजारपेठेतील दुकाने, उद्यम, प्रतीष्टाने बंद करण्याचे आवाहन केले असता दुकानदारानी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. या बंद चा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ छोटेखानी भाषन करून सम्पंन झाला.

हा भारत बंद हा ओबीसी ची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे व 52% ओबीसी ना 52 % प्रतिनिधीत्व मिळण्यात यावे या खास मागण्या सोबतच ईतरही मागण्या साठी, भारत बंद चिमूर शहरात पार पडला. या बंद ला भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांचे राष्ट्रीय स्तरावर सक्रिय समर्थन होते. भारत बंद चे आयोजन जिल्हा अध्यक्ष विठल येडमे यांचे नेतृत्वात तालुका संयोजक योगेश गेडाम, अक्षय माळवे, दिनेश कोडापे, गणेश मडावी, रतिराम डेकाटे, नागेश कोडापे, पंकज सीडाम, ऋतिक गेडाम, सोनू सिडाम, उमेश गेडाम, अमित उईके, श्रीकृष्ण दडमल, यांनी भारत बंद करीता अथक परिश्रम घेतले,

आऊटलुक इंडियाच्या सर्व्हेत ‘दी ग्रेटेस्ट इंडियन!’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here