Home महाराष्ट्र समाजातील विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचे काम महात्मा फुलेंनी केले –...

समाजातील विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचे काम महात्मा फुलेंनी केले – विजय डोंगरे

96

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.28नोव्हेंबर):- तालुक्यातील तलवाडा येथील समता सदन याठिकाणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना विजय डोंगरे सर म्हणाले की, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचे काम खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांनी केले आहे. परंतु आजही पुन्हा एकदा विषमतेचं बीज पेरलं जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या अभिवादन कार्यक्रमास सर्व स्तरातील मान्यवर मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील समता सदन याठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य युवराज तात्या डोंगरे, विजय डोंगरे सर, निवृत्त वरिष्ठ लेखाधिकारी बळीराम अण्णा शिंदे, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष दादाराव रोकडे, हभप गणेश महाराज कचरे, निवृत्त प्रा.गणपत नाटकर आदींनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व महापुरूषांचे विचार आत्मसात करावेत असे आवाहन देखील केले.

या अभिवादन कार्यक्रमास डॉ.आसाराम मराठे, सरपंच पती विष्णू तात्या हात्ते, उपसरपंच आज्जूशेठ सौदागर, पोलिस कर्मचारी रामेश्वर खंडागळे, मनसेचे रवि मरकड, शिवसेना सर्कल प्रमुख शेख रफिकभाई, राजाभाऊ विटकर, किशोर हात्ते, मदन करडे, डिपीआयचे जिल्हाउपाध्यक्ष मदन हातागळे, सचिन नाटकर, साहेबराव कुराडे, नवनाथ गर्जे, दत्तात्रय निकम, अशोक शिंदे, भरत शिंगणे, अरूण डोंगरे, रमेश आठवले, गोरख काळे, किशोर हजारे, काकुराम कांबळे, बंटी भांबरे, भिमा वाघमारे, पत्रकार अल्ताफ कुरेशी, अशोक सुरासे, विष्णू राठोड, डॉ.सुरेश गांधले, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन समता परिषदेचे गेवराई तालुकाउपाध्यक्ष – गणेश काळे यांनी केले होते. सुत्रसंचलन हभप गणेश महाराज कचरे यांनी तर आभारप्रदर्शन महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष – बापू गाडेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here