Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करा – स्वराज्य संघटना

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करा – स्वराज्य संघटना

76

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.28नोव्हेंबर):-महाराष्ट्राला या राज्यातील महापुरुषांमुळे जगा वेगळे वलैय व वैभव प्राप्त झालेले असुन महाराष्ट्रात राहणारे लोक प्रथम महाराष्ट्रियन मराठी अस्मितेत समाविष्ठ आसल्यामुळे जात धर्म पंथ या वितरित महापुरुषांना आपले आभिमान, स्वाभिमान मानत आसल्याने महापुरुषांचा आवमान, अपमान महाराष्ट्रियन लोक खपऊन घेणार नाहीत. या बाबत स्वराज्य संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन देऊन खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावर नियुक्त झाल्या पासून महाराष्ट्र राज्यातील महापुरूष व महाराष्ट्र राज्याच्या अस्मिता बाबत वारंवार वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्ये करीत आहेत.आपल्या भाषणांतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची विटंबना केली आहे. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या महाराष्ट्रियन जनतेच्या भावना दुखवण्याचा पोरखेळ केलेला आहे.
यापूर्वी देखील त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत पातळीहीन वक्तव्य करून या महान दाम्पत्याच्या कार्याची अवहेलना केलेली आहे.

या मुळे स्वराज्य संघटनेने तहसील प्रशासनास दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती महोदया व माननीय पंतप्रधान यांना विनंती केलेली आहे की, कोश्यारी यांना वेळीच आवर घालून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेचा मोठा उद्रेक होऊ शकतो.सदर निवेदनाची दखल घ्यावी व भगतसिह कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हटवावे अन्यथा महाराष्ट्रात जनआंदोलणाच्या माध्यमातून जे काही परिणाम होतील यास सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व आपण आपले शासन प्रशासन असेल याची नोंद घ्यावी असे निवेदन स्वराज्य संघटनेच्या वतीने गेवराई तहसील कार्यालयात देण्यात आले.

या निवेदनावर स्वराज्य संघटनेचे बीड जिल्हा निमंत्रक तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल चाळक, मुक्तराम मोटे,सुदाम मोरे,महेश पवार,अनिकेत नाटकर,अभिषेक जामकर,अमोल मोटे,अलीम सय्यद,सोमनाथ डोळस,गोकुळ जंगले,अभिषेक नाटकर,सचिन मोटे,सूरज घोडके, लक्ष्मण मोटे,जयराम काळे,दत्ता गिरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here