Home महाराष्ट्र संविधान दिन साजरा व काळजात ठसठसणाऱ्या जखमांचा प्रदेश कवितासंग्रहाचे प्रकाशन

संविधान दिन साजरा व काळजात ठसठसणाऱ्या जखमांचा प्रदेश कवितासंग्रहाचे प्रकाशन

88

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.28नोव्हेंबर);-दिनांक 26 नोव्हेंबर 2022 ला उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी येथे भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला तसेच संदीप गायकवाड लिखित *काळजात ठसठसणाऱ्या जखमांचा प्रदेश* या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रमिला मोरे मुख्याध्यापक या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली.त्यानंतर भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले गेले .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानासाठी केलेल्या कार्याची ओळख सुरेश खंगार सर यांनी करून दिली. तसेच अवंती गुरनुले या विद्यार्थिनीने भारतीय संविधानावर आपले मनोगत व्यक्त केले. कवी संदीप गायकवाड यांच्या काळजात ठसठसणाऱ्या जखमांचा प्रदेश या कवितासंग्रहाचे प्रकाशन कुमारी अवंती विनोद गुरनुले व रवींद्र तीमांडे यांच्या हस्ते करण्यात आले .

या कवितासंग्रहातील दाणं ही कविता सुरेश खंगार सर यांनी सादर केली.तसेच या कवितासंग्रहातील कवितावर भाष्य केले .या कार्यक्रमाचे संचालन सुरेश खंगार यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र तीमांडे सर यांनी मानले .या कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठा हिरिहिरीने भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here