Home महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळा झिलबोडी येथे संविधान दिन साजरा

जिल्हा परिषद शाळा झिलबोडी येथे संविधान दिन साजरा

147

🔹शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. भारती गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 26 नोव्हेंबर):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झिलबोडी येथे भारतिय संविधानदिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथि म्हणुन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा भारती ताई हेमंत गाडगे तसेच कुंदा ताई धोटे आंगनवाडी सेविका मन्दा ताई शेंडे मदतनीस व गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या प्रसंगी भारती ताई गाडगे यांनी संविधान व सामाजिक जबाबदारी यावर प्रकाश टाकला शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता पिसे मैडम यांनी भारतीय संविधान व नागरिकांचे हक्क कर्तव्य आणि अधिकार यावर सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांच्या भाषण संविधान गीत गायन व प्रस्तविका लेखन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाचे संचालन राऊत सर यांनी केले.

चातुर्वण्य व जातिभेद मानवनिर्मित उपद्व्याप!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here